ETV Bharat / entertainment

मिलिंद देवरांची पत्नी पूजा शेट्टीचं बॉलिवूडसोबत आहे अनोखं नातं; जाणून घ्या लव्हस्टोरी - शिंदे गटात प्रवेश केला

Milind Deora Wife Pooja Shetty : काँग्रेसचे दिग्गज आणि युवा नेते 'मिलिंद देवरा' यांनी काँग्रेस पक्ष सोडला आहे. त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. दरम्यान 'मिलिंद देवरा' यांची पत्नी पूजा शेट्टीचं बॉलिवूडमध्ये काय कनेक्शन आहे हे जाणून घेऊया.

Milind Deora Wife Pooja Shetty
मिलिंद देवरा पत्नी पूजा शेट्टी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 3:57 PM IST

मुंबई Milind Deora Wife Pooja Shetty : काँग्रेस पक्षाचे माजी खासदार मिलिंद देवरा सध्या चर्चेत आहेत. 'मिलिंद देवरा' यांनी काँग्रेस पक्षाशी असलेले 55 वर्षे जुने नाते संपुष्टात आणले आहे. ते आधी महाराष्ट्र काँग्रेसचा प्रसिद्ध मोठा चेहरा होते. मात्र, आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. देवरा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर काँग्रेसनं भाजपावर गंभीर आरोप केलेत.

पूजा आणि मिलिंद यांचं 2008 मध्ये लग्न : मिलिंद देवरा यांची पत्नी पूजा शेट्टी देवरा फिल्म इंडस्ट्रीत सक्रिय आहे. मिलिंद देवरा यांनी पुजा शेट्टीला काही वर्षे डेटिंग केल्यानंतर लग्न केलं. पूजा आणि मिलिंद यांचं 2008 मध्ये लग्न झालंय. या दोघांना एक मुलगीही आहे.

मिलिंद देवरा आणि पूजा शेट्टी यांचं नात : पूजाच्या वडिलांचं नाव मनमोहन शेट्टी आणि आईचे नाव शशिकला शेट्टी आहे. पूजानं तिचं शालेय शिक्षण मुंबईतील माणेकजी कूपर स्कूलमधून केलं असून, ती अमेरिकेतील परड्यू विद्यापीठातून मॅनेजमेंटमध्ये बॅचलर ऑफ सायन्समध्ये पदवी मिळवली आहे. यानंतर पूजा शेट्टीनं तिच्या वडिलांची कंपनी 'अ‍ॅडलॅब्स फिल्म्स लिमिटेड'मध्ये प्रवेश केला असून, तिनं अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे. 'अ‍ॅडलॅब्स फिल्म्स लिमिटेड'ची स्थापना 1978 मध्ये पूजाचे वडील मनमोहन शेट्टी आणि वासनजी ममानिया यांनी केली होती. 2009 मध्ये, या कंपनीचं नाव बदलून 'रिलायन्स मीडिया वर्क्स लिमिटेड' करण्यात आलं.

पूजा शेट्टीनं केली 'या' चित्रपटाची निर्मिती : पूजा शेट्टी देवरा सध्या चित्रपट निर्माती म्हणून काम करते. पूजानं 'राजनीती', 'तेरे बिन लादेन', 'रिटा' आणि 'द झोया फॅक्टर' यांसारख्या हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. ती सोशल मीडियावर खूप कमी सक्रिय असते. याशिवाय पूजा अधूनमधून तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. दरम्यान, बॉलिवूडमध्ये 'मिलिंद देवरा' आणि अभिषेक बच्चन यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. 'पा' चित्रपटात अभिषेक बच्चननं राजकीय व्यक्तीची भूमिका साकरली होती. या भूमिकेला आणखी प्रखर पडद्यावर आणण्यासाठी अभिषेकनं मिलिंद देवरा यांच्याकडून टिप्स घेतल्या होत्या. हे दोघेही अमेरिकेतील एका विद्यापीठात शिकले आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस 17'मध्ये अंकितासह विकी जैनला ज्योतिषींनी दिला 'हा' सल्ला
  2. वरुण तेज आणि मानुषी छिल्लर स्टारर 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'मधील 'वंदे मातरम' गाणं वाघा बॉर्डरवर होणार लॉन्च
  3. नवीन वर्षात कोणत्या वेबसीरीज पाहाव्यात? 'या' कलाकारांचे सिनेमा झाले आहेत प्रदर्शित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.