मुंबई : बॉलीवूडच्या दिग्गज गायकांच्या यादीत पंजाबी गायक मिका सिंहच्या नावाचाही समावेश आहे. त्याने आपल्या गायनाने सर्वांची मने जिंकली आहेत. मिका सिंहने बुधवारी कतारमधील दोहा विमानतळावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पंजाबी गायकाने लक्झरी लुई व्हिटॉन स्टोअरमध्ये खरेदी करताना भारतीय चलन वापरल्याचे सांगितले आहे. त्याला भारतीय चलन वापरल्याने खूप आनंद झाला. ही माहिती देताना मिका सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सलाम केला आणि भारतीय चलनाचे 'आंतरराष्ट्रीयकरण' केल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले.
हे आहे कारण : वास्तविक मिका सिंहने त्याच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'गुड मॉर्निंग, दोहा विमानतळावरील लुई व्हिटॉन स्टोअरमध्ये खरेदी करताना मला भारतीय रुपये वापरताना खूप अभिमान वाटला. कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये तुम्ही रु. वापरू शकणार हे आश्चर्यकारक आहे ना? आपला पैसा डॉलर सारखा वापरता आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लाख लाख सलाम.
-
Good morning.
— King Mika Singh (@MikaSingh) April 12, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I felt so proud to be able to use Indian rupees whilst shopping at #Dohaairport in the @LouisVuitton store. You can even use rupees in any restaurant.. Isn’t that wonderful? A massive salute to @narendramodi saab for enabling us to use our money like dollars. pic.twitter.com/huhKR2TjU6
">Good morning.
— King Mika Singh (@MikaSingh) April 12, 2023
I felt so proud to be able to use Indian rupees whilst shopping at #Dohaairport in the @LouisVuitton store. You can even use rupees in any restaurant.. Isn’t that wonderful? A massive salute to @narendramodi saab for enabling us to use our money like dollars. pic.twitter.com/huhKR2TjU6Good morning.
— King Mika Singh (@MikaSingh) April 12, 2023
I felt so proud to be able to use Indian rupees whilst shopping at #Dohaairport in the @LouisVuitton store. You can even use rupees in any restaurant.. Isn’t that wonderful? A massive salute to @narendramodi saab for enabling us to use our money like dollars. pic.twitter.com/huhKR2TjU6
पोस्टवर अशा आल्या कमेंट : मिका सिंहच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना बॉलीवूड अभिनेता विंदू सिंहने लिहिले, 'वाह भाई शानदार'. त्याचवेळी आणखी एका यूजरने 'भारतीय चलन मजबूत होत आहे', अशी कमेंट केली आहे. दुसऱ्याने 'नव्या भारताची शक्ती' असे लिहिले आहे. इतर युजर्सनी सोशल मीडियावर पोस्ट लाइक करणारे अनेक इमोजी शेअर केले आहेत.
स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा : UPI आता USA (UAE), इंडोनेशिया आणि मॉरिशसमध्ये विस्तारित केले जाऊ शकते. या प्रकल्पाचा भारतीय डायस्पोरा, विशेषत: परदेशात स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल अशी अपेक्षा आहे, कारण ते इतर पेमेंट सिस्टममध्ये प्रवेश न करता दोन्ही देशांदरम्यान जलद आणि किफायतशीर निधी हस्तांतरणास अनुमती देते.
हेही वाचा : Uttara Baokar Passed Away : प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे निधन; वयाच्या ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा