ETV Bharat / entertainment

Marathi Paul Padte Pudhe: मराठी तरुणांना व्यवसाय करण्यासाठी उद्युक्त करणारा चित्रपट, 'मराठी पाऊल पडते पुढे'!

मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वप्नील मयेकर यांचे अकस्मात निधन झाले. हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक दिवस अगोदर ही दुःखद घटना घडली. खरंतर 'मराठी पाऊल पडते पुढे' हा स्वप्नील मयेकर यांचा पहिला चित्रपट होता; परंतु त्यांच्या जीवनातील मोठा दिवस बघण्यासाठी ते या जगात राहिले नाहीत. परंतु 'शो मस्ट गो ऑन' म्हणत चित्रपटाच्या टीमने शोकाकुल वातावरणात चित्रपट प्रदर्शित केला.

author img

By

Published : May 6, 2023, 10:52 PM IST

Marathi Paul Padte Pudhe
'मराठी पाऊल पडते पुढे'!

मुंबई: हा चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणे हे स्वप्नील मयेकर यांचे स्वप्न होते आणि ती स्वप्नपूर्ती, त्यांच्या पश्चात, करताना सिनेमाच्या टीमला गहिवरून आले होते. महत्त्वाचं म्हणजे पहिल्याच दिवशी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळालाय. प्रदर्शित होणाऱ्या बहुभाषिक चित्रपटांच्या भाऊगर्दीत मराठी चित्रपटांना स्क्रीनस् मिळत नाहीत ही ओरड सतत होत असते; परंतु 'मराठी पाऊल पडते पुढे' ला आवश्यक शोज मिळाले असून त्याला मराठी प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. मराठी तरुणांनी फक्त नोकरीच्या आशेवर न राहता उद्योजक बनण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असा संदेश हा चित्रपट देतो. उत्तम प्रोडक्शन व्हॅलूज आणि कल्पक दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट आपले वेगळे स्थान निर्माण करतो. त्याच जोडीला गीत, संगीत आणि सकस अभिनय यामुळे सुद्धा सिनेमा वेगळ्या उंचीवर जातो.

अल्पसंतुष्ट मनोवृत्तीतून बाहेर पडा: नोकरी न करता व्यवसाय करा, हे ऐकायला बरं वाटतं; परंतु म्हणजे नेमकं काय करायचं? तसेच याची सुरुवात करताना येणाऱ्या अडचणींवर मात कशी करायची? व्यवसाय करण्याची मानसिकता कशी जोपासायची? आदी प्रश्नांवर तोडगा 'मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट पाहून मिळतो आणि तेही मनोरंजित होत. लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी मराठी माणसाने अल्पसंतुष्ट मनोवृत्तीतून बाहेर पडणे गरजेचे आहे, हे या चित्रपटात अधोरेखित केले आहे.

या कलावंतांनी घेतले परिश्रम: प्रकाश बाविस्कर निर्मित आणि अकात फिल्म्सचे संचालक आणि चंद्रकांत विसपुते यांची सहनिर्मिती आहे. या चित्रपटात चिराग पाटील, सिद्धी पाटणे, अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय कुलकर्णी, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रकाश बाविस्कर निर्मित व शिवलाईन फिल्म्स प्रस्तुत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा चित्रपट सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आहे.

हेही वाचा-

Supriya Sule As Best MP: सुप्रिया सुळे यांना पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदार होण्याचा मान

Sharad Pawar On Ajit Pawar : अजित पवारांच्या नियतीविषयी शरद पवार स्षष्टच बोलले; म्हणाले, अजित पवार हे तर....

Thane Crime : आई फोन उचलत नसल्याने मुलीने घर गाठले, दृष्य पाहून 'ती' झाली सुन्न...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.