ETV Bharat / entertainment

Sumi trailer released : शिक्षणाची प्रचंड ओढ असणाऱ्या 'सुमी'चे ट्रेलर झाले प्रदर्शित! - आकांक्षा पिंगळे

शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून त्यात स्त्री शिक्षण महत्त्वाचा भाग आहे. याच महिला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा सुमी हा चित्रपट असून त्याचा ट्रेलर नुकताच (sumi trailer released) प्रदर्शित करण्यात आला.

Sumi trailer released
'सुमी'चे ट्रेलर झाले प्रदर्शित
author img

By

Published : Nov 10, 2022, 3:16 PM IST

मुंबई: 'पोरीचं लगीन तर सगळेच करतात, मी माझ्या पोरीला शिकवून पाहते,' राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'सुमी' (Sumi Movie) चित्रपटातील हा संवाद बरेच काही बोलून जातो. शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून त्यात स्त्री शिक्षण महत्त्वाचा भाग आहे. याच महिला शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारा सुमी हा चित्रपट असून त्याचा ट्रेलर नुकताच (sumi trailer released) प्रदर्शित करण्यात आला.

सामाजिक संदेश: समाजात स्त्रियांचे काम चूल आणि मुल इतकेच नसून मुलीला शिकवणे किती महत्वाचे आहे, हा संदेश या चित्रपटात देण्यात आला असून 'सुमी'मध्ये कधी भांडणाऱ्या तर कधी एकमेकांना मदत करणाऱ्या आकांक्षा आणि दिवेशची निखळ मैत्री पाहायला मिळत आहे. सहज प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जाणारा, सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्याला दाखवावा असा आहे.

स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा प्रवास: डोळ्यांत अनेक स्वप्ने असणाऱ्या हसऱ्या 'सुमी'चे पोस्टर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर झळकले. बालदिनाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आलेला 'सुमी' प्रत्येकाने पाहावाच असे निर्माते सांगतात. 'सुमी' जिची भरपूर शिक्षण घेऊन ऑफिसर बनण्याची इच्छा आहे. तिच्या स्वप्नापर्यंत पोहोचण्याचा प्रवास यात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

मुख्य भूमिका: शिक्षणाची प्रचंड ओढ असणाऱ्या 'सुमी'ची भूमिका आकांक्षा पिंगळे (Ankanksha Pingale) हिने साकारली असून याव्यतिरिक्त या चित्रपटात दिवेश इंदुलकर (Divesh Indulkar), स्मिता तांबे (Smita Tambe), नितीन भजन (Nitin Bhajan) यांच्याही मुख्य भूमिका आहेत. अमोल वसंत गोळे (Amol Vasant Gole) दिग्दर्शित या चित्रपटाला रोहन -रोहन यांनी संगीत दिले आहे.

पालकांचा संघर्ष: ही कहाणी फक्त 'सुमी'ची नसून तिच्या आईवडिलांचीही आहे. 'सुमी'ची शिक्षणाची ओढ पाहता, तिचे आईवडील तिला साथ देताना दिसत आहेत. शिक्षण घेण्याचा तिचा अट्टाहास आणि त्यासाठी सुमी आणि तिच्या पालकांचा संघर्ष यात दिसतोय. 'पोरीचं लगीन तर सगळेच करतात, मी माझ्या पोरीला शिकवून पाहते' असे म्हणणारी 'सुमी' ची आई ही तेवढीच महत्वाकांक्षी आणि जिद्दी असल्याचे दिसून येतेय.

कौटुंबिक चित्रपट: प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणाले, 'सुमी'चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून बालदिनानिमित्ताने ही बालदोस्तांसाठी आमची खास भेट आहे. सिनेमा जरी बालदिनानिमित्ताने प्रदर्शित केला असला तरी तो प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाने पाहावा, असा आहे. ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ मध्ये 'सुमी'ला सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट आणि चित्रपटातील दोन्ही बालकलाकारांना 'सर्वोत्कृष्ट बालकलाकार' पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. 'सुमी' ही एका महत्वकांक्षी मुलीची कहाणी असून हा एक कौटुंबिक चित्रपट आहे.

ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद: दिग्दर्शक अमोल गोळे म्हणाले, 'सुमी' हा चित्रपट आमच्या संपूर्ण टीमसाठी आव्हानात्मक होता. मुळात या चित्रपटातील दोन्ही बालकलाकार हे नवखे आहेत. ही त्यांची पहिलीच फिचर फिल्म असून चित्रपट पाहताना हे कुठेही जाणवत नाही. आकांक्षा आणि दिवेश या दोघांची ऑनस्क्रीन मैत्री जितकी घट्ट आहे, तशीच मैत्री ऑफस्क्रीनही आहे. शूटिंगदरम्यान एकमेकांना खूप मदत केली. दोघांनीही एकमेकांना खूपच समजून घेतले आणि एकमेकांना प्रोत्साहन दिले. सुमीच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद उत्तम असून चित्रपटालाही असाच प्रतिसाद मिळेल, अशी आशा करतो.

'सुमी' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर: अक्षय विलास बर्दापूरकर आणि प्लॅनेट मराठी प्रस्तुत, हर्षल कामत एंटरटेनमेंट आणि गोल्डन माउस प्रोडक्शन्स, ए. ए. क्रिएशन्स, फ्लायिंग गॉड फिल्म्स निर्मित 'सुमी' या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल वसंत गोळे यांनी केले आहे. हर्षल कामत, स्वाती एस. शर्मा, मिहिर कुमार शर्मा हे निर्माते असून अंजली आनंद पांचाळ, जयादित्य गिरी, जयंत येवले व सोनाली जयंत हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची मूळ कथा - पटकथा संजीव झा यांची आहे. तर या चित्रपटाला प्रसाद नामजोशी यांचे संवाद आणि गीत लाभले आहे. 'सुमी'चे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होते की, तिला शिक्षणाला पूर्णविराम द्यावा लागतो, हे 'सुमी' पाहिल्यावरच कळेल. 'सुमी' लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीच्या माध्यमातून सर्वांच्या भेटीला येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.