ETV Bharat / entertainment

तृषा कृष्णनवर अभद्र टिप्पणी करणाऱ्या मन्सूर अली खानवर महिला आयोगानं केली कायदेशीर कारवाई

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 4:09 PM IST

Trisha krishnan and Mansoor Ali Khan : तृषा कृष्णनवर अभद्र वक्तव्य करणाऱ्या मन्सूर अली खाननं आज पत्रकार परिषद घेतली आणि त्यानं आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यास नकार दिला आहे. त्याच्यावर राष्ट्रीय महिला आयोगानं कायदेशीर कारवाई केली आहे.

Trisha krishnan and Mansoor Ali Khan
तृषा कृष्णन आणि मन्सूर अली खान

मुंबई - Trisha krishnan and Mansoor Ali Khan : 'लिओ' अभिनेता मन्सूर अली खान सतत चर्चेत असतो. अभिनेत्री तृषा कृष्णनबाबत त्यानं दिलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्याच्या अडचणीत वाढ झालीय. आता त्याच्यावर कायदेशीर कारवाईही सुरू झालीय. राष्ट्रीय महिला आयोगानंही तामिळनाडू पोलिसांना त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची सूचना केली आहे. मन्सूर अली खाननं एका पत्रकार परिषदेत तृषाबद्दल अभद्र टिप्पणी केली होती, त्यानंतर लोकेश कनगराजनेही आपला संताप व्यक्त करत याबद्दल टीका केली होती. आता राष्ट्रीय महिला आयोगानं या मुद्द्यावर मन्सूरवर कायदेशीर कारवाई केली आहे.

मन्सूर अली खान अडचणीत : नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात मन्सूर अलीनं तृषा कृष्णवर टीका करताना म्हटलं होत की, 'लिओ'मध्ये त्यानं भूमिका केली होती, मात्र चित्रपटामध्ये त्याला तृषा कृष्णनसोबत स्क्रीन शेअर करता आली नाही. याशिवाय त्यानं तृषाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर तृषानंही याप्रकरणी सडेतोड उत्तर दिलं होतं. तिनं उत्तर देत सोशल मीडियावर लिहलं, 'मी माझ्या करिअरमध्ये त्याच्यासोबत पुन्हा कधीही काम करणार नाही. त्याची इच्छा असेल पण मला त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली नाही, याबद्दल मी आभारी आहे'. मी माझ्या पुढील कारकिर्दीत त्याच्यासोबत कधीही चित्रपट करणार नाही, याची मी काळजी घेईन. त्याच्यासारखे लोक मानवजातीचं नाव बदनाम करतात'.

तृषाबद्दल मन्सूर अलीची टिप्पणी : 'तृषाबद्दल बोलताना मन्सूर अली म्हटलं की, 'मला वाटलं होतं की चित्रपटात एक बेडरूम सीन असेल. मी तिला बेडरूममध्ये घेऊन जाईन. जसं मी पूर्वीच्या चित्रपटांमध्ये इतर अभिनेत्रींना केलं, असं काही करायचं असेल, हा मी विचार केला होता. मी अनेक चित्रपटांमध्ये रेप सीन्स केले आहेत आणि हे माझ्यासाठी नवीन नाही. पण जेव्हा आम्ही शूटिंगसाठी काश्मीरला गेलो तेव्हा, मला तृषाला भेटू दिलं नाही'.

मन्सूर अली घेतली पुन्हा पत्रकार परिषद : मन्सूर अली खाननं आज, 21 नोव्हेंबर रोजी चेन्नई येथे पत्रकार परिषद घेतली आणि सांगितले की, मी आपल्या टिप्पणीबद्दल माफी मागणार नाही. यासोबतचं 'नादिगर संगम (द साउथ इंडियन आर्टिस्ट असोसिएशन) मन्सूर अली खान विरोधात नोटीस बजावली आहे. त्यामुळं मन्सूर अली आता अडचणीत सापडला आहे.

हेही वाचा :

  1. 'सिंघम' पुन्हा गर्जना करणार, अजय देवगणचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक रिलीज
  2. अल्लू अर्जुननं मुलगी अर्हाच्या वाढदिवासानिमित्त शेअर केली पोस्ट, पाहा फोटो
  3. 'इफ्फी' उद्घाटन समारंभात शाहिद कपूरनं केली 'कबीर सिंग' स्टाईलनं डॅशिंग बाइक एन्ट्री

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.