ETV Bharat / entertainment

ममता बॅनर्जींनी केला सलमान खानसोबत डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्ही पण एकदा पाहाच

Mamata Banerjee Dance : २९ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला ५ डिसेंबरपासून सुरुवात झाली. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सलमान खान आणि इतर बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत स्टेजवर डान्स करताना दिसल्या.

Mamata Banerjee Dance
Mamata Banerjee Dance
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 5, 2023, 10:43 PM IST

कोलकाता Mamata Banerjee Dance : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी (५ डिसेंबर) नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये २९ व्या कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन केलं. या कार्यक्रमात 'भाईजान' सलमान खान प्रमुख पाहुणा म्हणून आला होता. सलमाननं दीपप्रज्वलन करून चित्रपट महोत्सवाची सुरुवात केली. सलमानशिवाय अनिल कपूर, सोनाक्षी सिन्हा, महेश भट्ट, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी या सोहळ्याला हजेरी लावली. यावेळी सलमान खानचा विशेष सन्मान करण्यात आला.

ममता बॅनर्जी सलमानसोबत थिरकल्या : कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील अनेक छायाचित्रं आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बॉलिवूड स्टार्ससोबत डान्स करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सलमान खान ममता बॅनर्जींसोबत डान्स करताना दिसत आहे. यावेळी महेश भट्ट, सोनाक्षी सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा आणि अनिल कपूर देखील त्यांच्यासोबत थिरकताना दिसले. दुसर्‍या व्हिडिओमध्ये सलमान खान ममता बॅनर्जींचं कौतुक करताना दिसतोय.

  • VIDEO | "This is one of the biggest film festivals that I have attended. I am really glad to be here, I absolutely enjoy this place," says actor @BeingSalmanKhan speaking at International Film Festival in #Kolkata.

    (Full video is available on PTI Videos -… pic.twitter.com/6SUuRoAQAH

    — Press Trust of India (@PTI_News) December 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सलमानचा विशेष सन्मान : यावेळी टॉलिवूड अभिनेता देव यानं सलमानला स्मृतिचिन्ह प्रदान केलं. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डोना गांगुली यांच्या पथकानं एका गाण्यावर नृत्य करून पाहुणे आणि दिग्गज कलाकारांचं स्वागत केले. विशेष म्हणजे, त्या गाण्याचे बोल आणि संगीत स्वत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लिहिले आहेत. यावेळी सलमान, सोनाक्षी, शत्रुघ्न, अनिल कपूर आणि इतरांनीही परफॉर्म केलं. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही होत्या.

कोलकाता फिल्म फेस्टिवल : या वर्षी कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलच्या स्पर्धा श्रेणीत १५९० चित्रपट, ७२ फीचर फिल्म्स, ५० लघुपट आणि माहितीपट प्रदर्शनासाठी सादर करण्यात आले. तर बिगर स्पर्धा श्रेणीत ९७ चित्रपट आहेत. फेस्टीवलमध्ये ३९ देशांतील चित्रपटांना नामांकन मिळालं. यात एकूण २१९ चित्रपट दाखवले जाणार आहेत. यावेळी बंगाली पॅनोरमा विभागात सात बंगाली चित्रपट दाखवले जातील. 'मन पतंगा', 'बिजॉयर पोर', 'अबर आशिबो फिरे', 'बनबीबी', 'अनाथ', 'असोमपूर्ण' आणि 'मातृपक्ष' हे ते ७ चित्रपट आहेत. याशिवाय बॉलीवूड आयडॉल देव आनंद यांचे 'साजा', 'जॉनी मेरा नाम', 'गाइड', 'ज्वेल थीफ', 'जीत', 'सीआयडी' आणि 'बाजी' हे ७ चित्रपट दाखवले जाणार आहेत. हा महोत्सव १२ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

हेही वाचा :

  1. दीपिका पदुकोणचं 'फायटर' चित्रपटामधील फर्स्ट लूक पोस्टर रिलीज
  2. 'डंकी'चा ट्रेलर पाहून नेटिझन्सचे नाना तर्क वितर्क, कल्पनाविलासाची गगन भरारी
  3. रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'चं रानटी कलेक्शन, 4 दिवसांत 400 कोटींचा टप्पा पार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.