ETV Bharat / entertainment

Malaika Arora hug son Arhaan : मलायकाने मुलगा अरहान खानला मारली प्रेमाची मिठी, मायलेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल - रॉकी और रानी की प्रेम कहान

Malaika Arora hug son Arhaan : अभिनेत्री मलायका अरोराचा मुलगा अरहान खान अमेरिकेला शिक्षणासाठी रवाना झाला. लेकाला निरोप देण्यासाठी आई मलायका यावेळी मुंबई विमानतळावर हजर होती. प्रेमाची मिठी मारत तिने अरहानला बाय केले.

Malaika Arora hug son Arhaan
मलायकाने मुलगा अरहान खानला मारली प्रेमाची मिठी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 1:53 PM IST

Updated : Sep 1, 2023, 2:31 PM IST

  • मुंबई - Malaika Arora hug son Arhaan मलायका अरोरा आणि अरबाज खानचा हे जोडपे विभक्त झाले आहे. या माजी दांपत्याचा मुलगा अरहान खान सध्या अमेरिकेत महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. काही दिवसापूर्वी तो आणि मलयका मुंबईतील अनेक स्थावर फिरताना दिसले होते. आता त्याची सुट्टी संपली असून तो पुन्हा अमेरिकेला परतला आहे. यासाठी तो प्रवासासाठी जात असताना आई मलायकासोबत मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. दोघेही विमानतळावर हजर असलेल्या पापाराझींच्या कॅमेऱ्यात बंद झाले आहेत.

मलायका अरोरा आणि अरहान खान मुंबई विमानतळावर दिसल्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहेत. पापाराझी इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडिओत मलायका आपल्या मुलाला प्रेमाची उबदार मिठी मारताना दिसत आहे. त्यानंतर अरहानने आईचा निरोप घेतला.

यावेळी मलायकाने काळ्या रंगाचा मागच्या बाजूला कटवे असलेला लांब ड्रेस परिधान केला होता. यावेळी तिन केसांची वेणी मागे सोडली होती. अरहान खानने काळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि मॅचिंग ट्रॅक पॅन्टसह कॅप परिधान केली होती. मायलेकाच्या जोडीने शेअर केलेले हे सुंदर क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अरहान खान हा अरबाज खानचा मुलगा असून त्यालाही फिल्म इंडस्ट्रीमध्ये रस आहे. अलिकडेच रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटामध्ये त्याने करण जोहरचा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. तो अमेरिकेतील लॉंग आयलँड फिल्म स्कूलमध्ये चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेत आहे. आई वडीलांचा मोठा वारसा त्याला लाभला आहे. या क्षेत्रात त्याला स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे. यासाठी मलायका आणि अरबाज खानही त्याला सर्वोतोपरी सहकार्य करत आहेत.

मलायका अरोरा आणि अरबाज खान गेली सात वर्षे विभक्त राहत आहेत. २०१७ मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला आहे. मात्र दोघेही अरहानचे सहपलाक म्हणून काळजी घेताना दिसतात.

हेही वाचा -

१. Jawan Advance Booking : निवडक थिएटर्समध्ये १५ मिनीटात संपली जवान अ‍ॅडव्हान्स बुकिंगची तिकीटे, तिकीट खिडकीवर नोटांचा पाऊस

२. An end to Seema Haider speculations : बिग बॉस आणि कपिल शर्मामध्ये जाणार नसल्याचा सीमा हैदराचा खुलासा

३. Dream Girl 2 box office day 7: 'ड्रीम गर्ल 2' चित्रपट लवकरच गाठेल देशांतर्गत 70 कोटीचा टप्पा...

Last Updated : Sep 1, 2023, 2:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.