ETV Bharat / entertainment

माही विज आणि जय भानुशालीला स्वयंपाकीकडून जीवे मारण्याची धमकी - Mahhi vij death threat by cook

अभिनेता जय भानुशाली आणि त्याची पत्नी माही विज या जोडप्याला त्यांच्या स्वयंपाकीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तो त्यांना आणि त्यांच्या बाळाला भोसकणार असल्याचे त्याने म्हटले आहे. जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

माही विज आणि जय भानुशाली
माही विज आणि जय भानुशाली
author img

By

Published : Jul 1, 2022, 12:17 PM IST

मुंबई - प्रसिद्ध टीव्ही अभिनेता जय भानुशाली आणि त्याची पत्नी माही विज यांच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. या दाम्पत्याला आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ही धमकी दुसऱ्या तिसऱ्या कोणीही दिली नसून त्या जोडप्याच्या स्वयंपाक्याने दिली आहे. या धमकीबद्दल अभिनेत्री माहीने सोशल मीडियावर पोस्ट केली होती, मात्र भीतीमुळे तिने या सर्व पोस्ट डिलीट केल्या. आता खुद्द अभिनेत्रीनेच याबाबत खुलासा केला आहे.

गेल्या गुरुवारी माहीने यासंदर्भात अनेक ट्विट केले होते. या सर्व ट्विटमध्ये अभिनेत्रीने माहिती दिली होती की, तिने अलीकडेच स्वयंपाकी ठेवला होता. पण त्याने घरात चोरी करायला सुरुवात केली होती. दाम्पत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी स्वयंपाक्याला अटक केली होती, मात्र नंतर त्याची जामिनावर सुटका झाली व त्यानंतर दाम्पत्य घाबरले आहे. कारण कुकने त्याच्यावर खंजीर खुपसण्याची धमकी दिली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, माहीने सांगितले की, 'कुकला कामावर घेऊन फक्त तीन दिवस झाले होते आणि त्याने चोरी करायला सुरुवात केली होती, मी जयला याबद्दल सांगण्याची वाट पाहत होतो, आणि जेव्हा जय आला तेव्हा बिल सेटल केले. पण कुक पूर्ण महिन्याभराचे पैसे मागत होता. यावर जय म्हणाला की त्यावेळी कुकने दारुही प्याली होती. त्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार केली. आम्हाला आमची नाही परंतु मुलीची काळजी वाटते.

वृत्तानुसार, पोलिसात तक्रार केल्यानंतर आरोपी कुकला अटक करण्यात आली, पण नंतर त्याला जामीन मिळाला. कुकच्या सुटकेवर माही म्हणाली, जेव्हा मी आणि जय पोलिस स्टेशनला गेलो तेव्हा तो फोन करत राहिला, त्याचे सर्व रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, कारण आता देशातील वातावरण खूप बदलले आहे, त्यामुळे आता भीती वाटते.

हेही वाचा - जॉन अब्राहम आणि अर्जुन कपूर अभिनित एक व्हिलन रिटर्नचा अॅक्शनपॅक्ड ट्रेलर रिलीज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.