मुंबई - Mahesh Bhatt and Ranbir Kapoor : सध्या अभिनेता रणबीर कपूर त्याच्या 'अॅनिमल' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. अलीकडेच तो चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रिअॅलिटी शोमध्ये पोहोचला होता. यादरम्यान शोच्या निर्मात्यांनी महेश भट्टचा संदेश रणबीर कपूरला दाखवला. या संदेशात महेश भट्टनं जावयाचे खूप कौतुक केले आहे. व्हिडिओ क्लिपमध्ये महेश भट्टनं म्हटलं, 'माझी मुलगी आलिया म्हणते की रणबीर एक उत्तम अभिनेता आहे. पण मी त्याला जगातील सर्वोत्कृष्ट बाप मानतो. तो राहाकडे ज्या नजरेनं पाहतो त्याच्या डोळ्यातलं भाव तुम्हाला दिसले असतील. त्याची आई नीतू सांगते की आई आपल्या मुलींवर ज्याप्रमाणे प्रेम करते त्याप्रमाणे, रणबीर राहावर प्रेम करतो. मला रणबीर कपूरसारखा जावई मिळाला याचा मला अभिमान वाटतो'.
-
Mahesh Bhatt about Superstar Ranbir Kapoor ❤️
— ranbir_ki_muskaan (@Ranbirian4ever) November 25, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The way RK loves Raha has not been hidden from us 🫶🫶
This phase is the best he could have wished for 🧿#RanbirKapoor #AnimalTheFilm #Animal pic.twitter.com/3YZvEzfLs7
">Mahesh Bhatt about Superstar Ranbir Kapoor ❤️
— ranbir_ki_muskaan (@Ranbirian4ever) November 25, 2023
The way RK loves Raha has not been hidden from us 🫶🫶
This phase is the best he could have wished for 🧿#RanbirKapoor #AnimalTheFilm #Animal pic.twitter.com/3YZvEzfLs7Mahesh Bhatt about Superstar Ranbir Kapoor ❤️
— ranbir_ki_muskaan (@Ranbirian4ever) November 25, 2023
The way RK loves Raha has not been hidden from us 🫶🫶
This phase is the best he could have wished for 🧿#RanbirKapoor #AnimalTheFilm #Animal pic.twitter.com/3YZvEzfLs7
रणबीर महेश भट्टसाठी म्हटलं : महेश भट्टचा हा मेसेज पाहून रणबीर म्हटलं की, 'ते माझ्यासमोर अशा गोष्टी कधीच बोलल्या नाहीत. त्यामुळे मी 'इंडियन आयडॉल'चे आभार मानू इच्छितो. मी माझ्या सासरी पास झालो आहे'. रणबीरचा 'अॅनिमल ' चित्रपट 1 डिसेंबर रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत रश्मिका मंदान्ना अनिल कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, परिणीती चोप्रा, सुरेश ओबेरॉय, शक्ती कपूर, प्रेम चोप्रा, सौरभ सचदेवा, सौरभ शुक्ला आणि इतर कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. हा ट्रेलर अनेकजणांना आवडला आहे.
चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू : 'अॅनिमल ' चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग जोरदार सुरू झाली आहे. निर्मात्यांनी 6 दिवस अगोदरच चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू केले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अपेक्षा केली जात आहे. 'अॅनिमल' चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वंगा यांनी केलंय. 'अॅनिमल' चित्रपटाद्वारे पहिल्यादांच रणबीर आणि रश्मिका रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' प्रमाणपत्र मिळाल आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी रणबीरचे चाहते खूप उत्सुक आहे.
हेही वाचा :