मुंबई - महेश बाबू ( Mahesh Babu ) यांनी नुकतेच अदिवी शेषच्या आगामी 'मेजर' चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी एक विधान केले, ज्यामुळे चर्चेला उधाण आले होते. बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करण्याच्या त्याच्या योजनांबद्दल विचारले असता, अभिनेत्याने सांगितले की "बॉलिवुड त्याला परवडत नाही" ( Bollywood cannot afford me ) . हे विधान वेगळ्या संदर्भात काढण्यात आले असूनही, सोशल मीडियावर त्याच विषयावर चर्चा रंगत आहे.
-
Ofcourse he did..
— Abhi (@Not_extremist_) May 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
What big deal
Video here Mr @kamaalrkhan #Bollywood Can't afford me, I don't want to waste my time#MaheshBabu #SarkaaruVaariPaata #SVPMania #Tollywood #SuperStarMaheshBabu #Major#SarkaruVaariPataa #SVPOnMay12 https://t.co/HynXl4TpOZ pic.twitter.com/4KAzFaJMdj
">Ofcourse he did..
— Abhi (@Not_extremist_) May 10, 2022
What big deal
Video here Mr @kamaalrkhan #Bollywood Can't afford me, I don't want to waste my time#MaheshBabu #SarkaaruVaariPaata #SVPMania #Tollywood #SuperStarMaheshBabu #Major#SarkaruVaariPataa #SVPOnMay12 https://t.co/HynXl4TpOZ pic.twitter.com/4KAzFaJMdjOfcourse he did..
— Abhi (@Not_extremist_) May 10, 2022
What big deal
Video here Mr @kamaalrkhan #Bollywood Can't afford me, I don't want to waste my time#MaheshBabu #SarkaaruVaariPaata #SVPMania #Tollywood #SuperStarMaheshBabu #Major#SarkaruVaariPataa #SVPOnMay12 https://t.co/HynXl4TpOZ pic.twitter.com/4KAzFaJMdj
"मी गर्विष्ठ आहे असे वाटू शकते, पण मला हिंदीत अनेक ऑफर मिळाल्या आहेत. तथापि, मला विश्वास आहे की ते मला परवडणार नाही. मला माझा किंवा इतरांचा वेळ वाया घालवायचा नाही. मी तेलुगू सिनेमा सोडण्याचा किंवा इतर सिनेमांमध्ये जाण्याचा विचार कधीच केला नाही, कारण मला येथे प्रसिद्धी आणि प्रेम मिळाले आहे." असे महेश बाबूने म्हटले होते. त्याच्या या विधानाचे जोरदार समर्थन त्याचे चाहते करीत आहेत.
"मी नेहमीच येथे चित्रपट बनवण्याची आणि त्यांची लोकप्रियता वाढताना पाहण्याची अपेक्षा बाळगली आहे, आणि ते स्वप्न आता सत्यात उतरत आहे. मला यापेक्षा जास्त आनंद होऊ शकत नाही," असे महेश बाबू यांनी कार्यक्रमात सांगितले.
महेश बाबूचे चाहते मात्र त्याच्या विधानावर आपली टोकाची मते व्यक्त करीत आहेत. ''महेश बाबू रिमेकमध्ये काम करण्यास कम्फर्टेबल नाही, याबद्दल तो नेहमीच खुला असतो.'', असे एकाने म्हटलंय. "एखाद्या व्यक्तीला ठराविक जागेत काम करायचे नसेल, तर ती व्यक्ती त्यांचा आदर करत नाही असे का समजावे?", असे त्याच्या एका चाहत्याने लिहिले. "आम्हाला अभिनेत्यांच्या प्रत्येक विधानावरून वाद का निर्माण करावा लागतो", असे आणखी एकाने लिहिले.
हेही वाचा - शाहरुखच्या 'डंकी'चे कलाकार ठरले, 'किंग खान'सोबत पहिल्यांदाच दिसणार हे स्टार्स