ETV Bharat / entertainment

Kuch Kuch Hota Hai Special Screening : 'कुछ कुछ होता है'ला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मुंबईत आयोजित केले स्पेशल स्क्रीनिंग... - कुछ कुछ होता हैला 25 वर्षे पूर्ण

Kuch Kuch Hota Hai Special Screening : अभिनेता शाहरुख खान, अभिनेत्री राणी मुखर्जी आणि करण जोहर यांनी 'कुछ कुछ होता है'ला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्पेशल स्क्रीनिंगला हजेरी लावली. यादरम्यानचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये 'किंग खान' हा राणीच्या साडीचा पदर पकडताना दिसत आहे.

Kuch Kuch Hota Hai Special Screening
कुछ कुछ होता है स्पेशल स्क्रिनिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2023, 11:10 AM IST

Updated : Oct 16, 2023, 12:36 PM IST

मुंबई - Kuch Kuch Hota Hai Special Screening : शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी स्टारर 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी चित्रपटाचं स्पेशल स्क्रीनिंग 15 ऑक्टोबर रोजी मुंबईत करण्यात आलं. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांपैकी एक असलेल्या करण जोहरनं दिग्दर्शित केलेला हा चित्रपट आजही चित्रपटरसिकांच्या काळजात घर करुन आहे. 'कुछ कुछ होता है' चित्रपटाची कहाणी प्रेम आणि मैत्रीवर आधारित आहे. मुंबईतील या खास स्क्रीनिंगदरम्यान एसआरके, राणी आणि करणनं थिएटरला भेट देऊन चाहत्यांना एक मोठं सरप्राईज दिलं. या कार्यक्रमाला काजोल उपस्थित राहू शकली नाही.

'कुछ कुछ होता है' स्पेशल स्क्रिनिंग : इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि करण जोहर 'कुछ कुछ होता है'च्या स्पेशल स्क्रीनिंगला अचानक मुंबईतील एका थिएटरमध्ये पोहोचले. यावेळी किंग खाननं लेदर जॅकेट आणि जीन्स घातली होती. तर ​राणीनं फिकट गुलाबी रंगाची सुंदर साडी नेसली होती. याशिवाय करण हा ब्लॅक आउटफिटमध्ये होता. तिघांचा थिएटरमध्ये प्रवेश होताच चाहत्यांनी उत्साहानं त्यांच्या नावाचा जयघोष सुरू केला. दुसरीकडे, 'धर्मा प्रॉडक्शन'नं शाहरुख, करण जोहर आणि राणीचा थिएटरमधील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर कॅप्शनमध्ये देत त्यांनी लिहिलं, 'या सर्वांना एकाच फ्रेममध्ये पाहून खूप छान वाटलं! या खास प्रसंगी प्रेम आणि मैत्री साजरी करत आहे, 'कुछ कुछ होता है'ला 25 वर्षे झाली.'

किंग खाननं राणी मुखर्जीच्या साडीचा पल्लू हातात पकडला : स्क्रिनिंगमधून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खान राणी मुखर्जीचा पदर पकडताना दिसत आहे. 'किंग खान'चा हा अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला आहे. शाहरुख आणि राणीनं करणचं 'कुछ कुछ होता है'ला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केलं. यावेळी या तिघांनीही चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित त्यांच्या आठवणीही शेअर केल्या. जुन्या आठवणी ताज्या करत शाहरुख या खास आपण काजोलला 'मिस' केल्याचं म्हणाला. याशिवाय त्यानं या चित्रपटाचा भाग असल्याबद्दल सलमान खानचे देखील आभार मानले. 25 वर्षांपासून 'कुछ कुछ होता है'वर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल राणी मुखर्जीनं चाहत्यांचे आभार मानले.

'कुछ कुछ होता है' लव्ह ट्रँगल स्टोरी : 'कुछ कुछ होता है' बद्दल बोलायचं झाल तर, हा रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये राहुल खन्ना (एसआरके), अंजली शर्मा (काजोल) आणि टीना मल्होत्रा ​(राणी मुखर्जी) या तीन व्यक्तिरेखांवर बेतलाय. चित्रपटाला खास करण जोहरच्या स्टाइलची फोडणी आहे. वेगळ्या धाटणीचा लव्ह ट्रँगल म्हणून ओळखला गेलेला हा चित्रपट आज सुप्परहिट चित्रपटाच्या यादीत आहे. या चित्रपटामध्ये अमन मेहरा (सलमान खाननं) खास कॅमिओ केला आहे.

हेही वाचा :

  1. Prabhas Instagram Account : अभिनेता प्रभासचे इन्स्टाग्राम अकाउंट डिअ‍ॅक्टिव्हेट
  2. Urvashi Rautela Iphone : भारत-पाकिस्तान सामना पाहणं पडलं महागात; उर्वशी रौतेलाचा सोन्याचा 'आयफोन' हरवला
  3. Priyanka Chopra and Nick jonas : निक जोनासनं पत्नी प्रियांका चोप्रा आणि मुलगी मालती मेरीसह इंस्टाग्रामवर फोटो केले शेअर...

Last Updated : Oct 16, 2023, 12:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.