ETV Bharat / entertainment

'कॉफी विथ करण सीझन 8'मध्ये आदित्य रॉय कपूरनं 'आशिकी 3'बद्दल दिली 'ही' प्रतिक्रिया - karan johar

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या नवीन एपिसोडमध्ये आदित्य रॉय कपूर आणि अर्जुन कपूर हजेरी लावणार आहेत. या एपिसोडमध्ये आदित्य हा 'आशिकी 3'बद्दल बोलताना दिसेल.

Koffee With Karan 8
कॉफी विथ करण 8
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 14, 2023, 11:47 AM IST

मुंबई - Koffee With Karan 8: 'कॉफी विथ करण 8' च्या नवीन एपिसोडमध्ये, आदित्य रॉय कपूरनं 'आशिकी 3'मध्ये कार्तिक आर्यनच्या अभिनयावर आणि फ्रेंचायझीवर प्रतिक्रिया दिली. गेल्या वर्षी, अनुराग बसू दिग्दर्शित आणि भूषण कुमार आणि मुकेश भट्ट निर्मित 'आशिकी 3' मध्ये कार्तिक आर्यन भूमिका साकारण्यासाठी सज्ज असल्याची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान 'आशिकी 2' मध्ये आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळालं. आता 'कॉफी विथ करण सीझन 8'च्या आगामी एपिसोडमध्ये, आदित्य रॉय कपूरनं कार्तिक आर्यनला आशिकी फ्रँचायझीमध्ये घेतल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

'आशिकी 3'च्या कास्टिंगवर आदित्य रॉय कपूर दिली प्रतिक्रिया : 'कॉफी विथ करण सीझन 8' वर करण जोहरनं आदित्य रॉय कपूरला कार्तिक आर्यनच्या 'आशिकी 3' मध्ये कास्ट करण्याबद्दल विचारले. यावर त्यानं म्हटलं, ''मला वाटते की 'आशिकी 3'मध्ये अभिनय करण्यासाठी कार्तिक हा परिपक्व व्यक्ती आहे''. पुढं त्यानं म्हटलं, ''या चित्रपटामध्ये मी असण्याची शक्यता कमी होती, कारण दुसऱ्या भागात माझी व्यक्तिरेखा खूप लांब पोहोचली होती जिथून मी परत येऊ शकणार नाही''. आदित्यसोबत या कॉफी सोफ्यावर अर्जुन कपूरनं देखील हजेरी लावली आहे. आदित्यनं 'द नाईट मॅनेजर' या हिट वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. या हिट वेब सीरीजवर बोलताना अर्जुन कपूरनं म्हटल, ''आता आदित्य नाईट मॅनेजर झाला आहे''.

'आशिकी 3'मध्ये दिसणार कार्तिक आर्यन : आदित्य रॉय कपूरनं त्याच्या हिट 'आशिकी 2'बद्दल बोलताना म्हटलं, ''मला खूप छान वाटतंय, मी या चित्रपटामध्ये मेलो. आता मी कुठे परत येईन? माझा आत्मा परत येईल''. त्यानंतर करण जोहरनं गंमतीनं म्हटलं की, ''आदित्य कार्तिक आर्यनला त्रास देईल''. यावर आदित्यनं उत्तर दिलं, ''होय, मी कार्तिक आर्यनला त्रास देईल. यानंतर करण म्हणाला की, 'ही एक चांगली कहाणी आहे मला असं वाटत आहे''. सप्टेंबर 2022 मध्ये, 'आशिकी 3'च्या निर्मात्यांनी घोषणा केली की कार्तिक आर्यनची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. कार्तिकनं या घोषणेचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. या चित्रपटात कोणत्याही अभिनेत्रीला अद्याप कास्ट केले गेले नाही.

हेही वाचा :

  1. ईशा मालवीयनं अभिषेक कुमारवर हात उगारल्याचा केला आरोप
  2. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं - कलावंत गौतमी पाटील
  3. मुनावर फारुकी ठरणार बिग बॉस 17 च्या घराचा पहिला कॅप्टन?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.