मुंबई - Latest 3 flims BO collection : फुक्रे फ्रँचायझीचा 'फुक्रे 3' हा चित्रपट गुरुवारी, 28 सप्टेंबर रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या विनोदी चित्रपटाच्या ट्रेलरनं लोकांचे खूप मनोरंजन केले आहे. दरम्यान आता हा चित्रपट खूप जास्त प्रेक्षकांना हसवताना दिसत आहे. पहिल्या दोन भागांप्रमाणे हा चित्रपट लोकांच्या पसंतीला उतरला आहे. 'फुक्रे' फ्रेंचाइजीचे पहिले दोन चित्रपट खूप हिट झाले होते. 'फुक्रे ३' या चित्रपटामध्ये पहिल्या दोन चित्रपटांची स्टारकास्ट त्याच व्यक्तीरेखांसह आहे. यावेळी फक्त अली फजल हा चित्रपटाचा भाग नाही. 'फुक्रे 3' मध्ये पुलकित सम्राट, वरुण शर्मा, पंकज त्रिपाठी, मनजोत सिंग आणि रिचा चढ्ढा मुख्य हे कलाकार भूमिकेत आहेत. हा चित्रपट वीकेंडपर्यंत चांगले कलेक्शन करेल. 'फुक्रे ३'नं रूपेरी पडद्यावर सुरुवात खूप जबरदस्त केली आहे.
'फुक्रे 3'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन: 'फुक्रे 3' चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 8.82 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 7.50 कोटीचा व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 16.32 कोटी झालं आहे. दरम्यान आता 'फुक्रे 3'चा रिलीजचा तिसरा दिवस सुरू झाला आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी हा चित्रपट 10.52 कोटी कमाई करू शकतो असा अंदाज वर्तविला जात आहे. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 27.2 होईल. 'फुक्रे 3' बद्दल सांगायचे तर, मृगदीप सिंग लांबा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट फरहान अख्तरच्या प्रोडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत बनवला गेला आहे.
'चंद्रमुखी 2'आणि 'द व्हॅक्सिन वॉर' चित्रपटाचं कलेक्शन : कंगना राणौतच्या 'चंद्रमुखी 2' या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. सुरुवातीच्या दिवसात या चित्रपटाची आगाऊ बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटानं आतापर्यत 12.75 कोटीची कमाई केली आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे. 'फुक्रे 3'सोबत 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट देखाल प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आहेत. त्यांचा 'द काश्मीर फाइल्स' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाकडून अनेकांना खूप अपेक्षा होत्या. या चित्रपटाचं कलेक्शन निराशाजनक आहे. हा चित्रपट विज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे शहरी प्रेक्षक अधिक आकर्षित होतील, असा विश्वास निर्मात्यांना होता. या चित्रपटानं आतापर्यत 1.70 कोटींचा गल्ला गाठला आहे.
हेही वाचा :