ETV Bharat / entertainment

KL Rahul birthday : के एल राहुलने पत्नी अथिया शेट्टीसोबत केला वाढदिवस, सुनिल शेट्टीनेही दिल्या शुभेच्छा - एलएसजेने दिल्या कप्तानला शुभेच्छा

दिग्गज क्रिकेटपटू केएल राहुल मंगळवारी आपला वाढदिवस साजरा करत आहे. तो त्याचा वाढदिवस पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत साजरा करताना दिसला. दरम्यान, सुनील शेट्टीने इंस्टाग्रामवर स्टार क्रिकेटरला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याच्यासोबत एक सुंदर फोटो शेअर केला.

केएल राहुलने पत्नी अथिया शेट्टीसोबत केला वाढदिवस

author img

By

Published : Apr 18, 2023, 1:21 PM IST

मुंबई - अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. काही काळ डेटिंग केल्यानंतर या जोडप्याने या वर्षी जानेवारीमध्ये लग्न केले. खंडाळ्यातील सुनील शेट्टीच्या फार्महाऊसवर त्यांनी कमी लोकांच्याउपस्थितीत विवाह सोहळा पार पाडला. त्यानंतर केएल राहुल त्यांच्या लग्नानंतर टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी निघून गेला आणि तो सध्या आयपीएलमध्ये गुंतला आहे. पण आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याने पत्नी अथियासोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतल्याचे दिसून येत आहे. फोटोंमध्ये जोडपे त्यांचा वाढदिवस एकत्र साजरा करताना दिसत आहेत.

केएल राहुल वाढदिवसाचे सेलेब्रिशन - त्याच्या एका मित्राने केएल राहुलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पहिल्या फोटोमध्ये मित्रासोबत पोज देताना अथिया आणि राहुल आकर्षकपणे हसताना दिसत आहेत. दुसऱ्या इमेजमध्ये, स्टार क्रिकेटर वाढदिवसाचा केक कापताना दिसत आहे तर अथिया त्याच्या शेजारी उभी आहे.

सुनिल शेट्टीने दिल्या शुभेच्छा - दरम्यान, सुनील शेट्टीने इंस्टाग्रामवर त्याचा जावई केएल राहुलसोबतचा एक पूर्वी न पाहिलेला फोटो शेअर केला आहे. फिटनेस उत्साही असलेल्या सुनील शेट्टीने राहुलसाठी वाढदिवसाचा खास संदेश पोस्ट केला आहे. त्याने त्याच्या आणि अथिया शेट्टीच्या लग्नातील केएल राहुलसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सुनील शेट्टी वारंवार त्याचे कौतुक करताना दिसतो. त्याने केएल राहुलला वाढदिवसाचा सुंदर संदेशही लिहिला. अथियाचा भाऊ अहान शेट्टीनेही केएल राहुलला फोटोसह शुभेच्छा दिल्या. या फोटोला त्याने इंस्टाग्रामवर ‘हॅपी बर्थडे ब्रदर’ असे कॅप्शन दिले आहे. तथापि, अथियाने अद्याप तिच्या पतीसाठी वाढदिवसाची पोस्ट शेअर केलेली नाही. के एल राहुल हा लखनौ आयपीएल संघाचा कर्णधार आहे. या टीमसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. लखनौ सुपर जायंट्सच्या ट्विटरवर आजचा दिवस साजरा करण्याचा सल्ला इतर खेळाडूंना मिळाला आहे. त्यांनी लिहिलंय, आजच्या दिवशी करायच्या गोष्टी... कप्तनाचा वाढदिवस साजरा करा आणि आयपीएलचाही वाढदिवस साजरा करा.

आयपीएलचा वर्धापनदिन - आयपीएलचा पहिला सामना 18 एप्रिल 2008 रोजी झाला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) यजमान कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यातील पहिला सामना ) एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला गेला. भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली हा सामना खेळला गेला. अशा प्रकारे आयपीएलचाही आज १५ वा वर्धापनदिन साजरा होत आहे.

हेही वाचा - Raghav Juyal Breaks Silence : शहनाज गिलसोबत राघव जुयालची डेटिंग असल्याची अफवा, अभिनेता म्हणाला...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.