ETV Bharat / entertainment

Athiya Shetty And KL Rahul Wedding : शेट्टी कुटूंबात लगीनघाई! केएल-अथिया 'या' तारखेला अडकणार लग्नबंधनात - सुनील शेट्टी

अभिनेता सुनील शेट्टीची (Suniel Shetty) मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि क्रिकेटर केएल राहुल (Cricketer KL Rahul) यांच्या लग्नाची चर्चा होत असली तरी आता या दोघांच्या लग्नाची तारीख समोर आली आहे. (Athiya Shetty And KL Rahul Wedding)

Athiya Shetty And KL Rahul Wedding
केएल-अथिया अडकणार लग्नबंधनात
author img

By

Published : Dec 13, 2022, 1:58 PM IST

हैदराबाद : टीम इंडियाचा सलामीवीर केएल राहुल आणि बॉलिवूडचा दमदार अभिनेता सुनील शेट्टी आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. अभिनेता सुनील शेट्टीने अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या लग्नावर मोठे वक्तव्य केले आहे. सुनीलने सांगितले की, लवकरच तो आपल्या मुलीचे लग्न करणार आहे. विशेष म्हणजे येत्या काही दिवसांतच अथिया आणि राहुल विवाहबंधनात अडकणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर पुढच्या वर्षी जानेवारीत हे जोडपे सात फेरे घेणार आहेत. (Athiya Shetty And KL Rahul Wedding)

जाणून घ्या कसे असेल अथिया-राहुलचे लग्न? : मीडिया रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि राहुलचे लग्न पारंपारिक पद्धतीने होणार आहे, परंतु अद्याप या जोडप्याच्या कुटुंबीयांनी याची पुष्टी केलेली नाही. पण असे बोलले जात आहे की, 21 ते 23 जानेवारी 2023 रोजी हे दोघे कायमचे लग्न करणार आहेत. अद्याप याविषयी स्टार कुटुंबाकडून कोणतेही विधान आलेले नाही आणि त्याला दुजोराही मिळालेला नाही. (Athiya Shetty And KL Rahul Wedding date )

अथिया-राहुलचे लग्न कुठे होणार? : रिपोर्ट्सनुसार, अथिया आणि राहुलचे लग्न परदेशात नाही तर देशातच होणार आहे. खंडाळा (मुंबई) येथील सुनील शेट्टी यांच्या फार्म हाऊसवर हे जोडपे विवाहबंधनात अडकणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे लग्नाची तयारी सुरू झाली असून या जोडप्याच्या लग्नाची वेशभूषा तयार करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

अथिया शेट्टीने दिला लग्नाचा इशारा? : या वर्षी जुलैच्या सुरुवातीला जेव्हा दोघांच्या लग्नाच्या अफवांना पहिल्यांदा उधाण आले, तेव्हा अथियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर या अफवा फेटाळून लावल्या आणि लिहिले, 'मला आशा आहे की, मला लग्नासाठी आमंत्रित केले जाईल. जे 3 महिन्यात होणार आहे'.

सुनील शेट्टीचे वक्तव्य? : सुनील शेट्टी त्याच्या आगामी 'धारावी बँक' या मालिकेमुळे चर्चेत आहे. या संदर्भात त्याने मुलीच्या लग्नाच्या प्रश्नावर एका मुलाखतीत सांगितले की, 'ते लवकरच होईल', पण ते कधी होईल हे सांगितले नाही. आता सुनीलचे चाहते त्या दिवसाची वाट पाहत आहेत, जेव्हा तो आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख जाहीर करेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.