ETV Bharat / entertainment

Jawan box office collection day 4 : शाहरुख खान स्टारर 'जवान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर करत आहे जादू...

Jawan box office collection day 4 : बॉलीवूडचा किंग खानचा 'जवान' 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि हा सर्वात मोठा ओपनिंग देणारा चित्रपट ठरला. या चित्रपटानं तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे.

Jawan box office collection day 4
जवान बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 12:31 PM IST

मुंबई - Jawan box office collection day 4 : सुपरस्टार शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अशी खळबळ उडवून दिली आहे, ज्याची कल्पनाही कोणी केली नसेल. 'जवान'चं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 50 ते 70 कोटी रुपये असेल अशी अपेक्षा व्यापार तज्ज्ञांना होती पण किंग खाननं पहिल्याच दिवशी 129 कोटीपेक्षा जास्त कमाई जगभरात करून सिद्ध केलं की, तोच बॉलिवूडचा खरा किंग आहे. 'जवान' हा चित्रपट लवकरच 500 कोटीची कमाई करेल अशी अपेक्षा आता केली जात आहे. हा चित्रपट देशांतर्गत सर्वच भाषांमध्ये जबरदस्त कमाई करत आहे. 'जवान' जगभरात चांगलाच धुमाकूळ सध्या घातल आहे.

'जवान' बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार 'जवान'नं पहिल्या दिवशी 75 कोटीची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 53 कोटी आणि तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 74.5 कोटीचा व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 202.73 कोटी झाले. आता 'जवान' हा रिलीजच्या चौथ्या दिवसात दाखल झाला आहे. हा चित्रपट चौथ्या दिवशी 80 कोटी कमाई करू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यासह या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 282.73 कोटी होईल. हा चित्रपट 5 दिवसात 300 कोटी नक्कीच कमाई करेल असं सध्या दिसत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी करत आहेत.

'जवान'ची क्रेझ : 'जवान' चित्रपटाचा सध्या खूप क्रेझ पाहायला मिळत आहे, सोशल मीडियावर सध्या 'चलेया' गाण्यानं चाहत्यांवर जादू केला आहे. या चित्रपटामधील 'चलेया' या गाण्यावर अनेकजण रिल्स बनवत आहे. दरम्यान आता 'जवान'चे चौथ्या दिवशी देशभरात 20 हजार शो होणार असल्याचं समजत आहे. या चित्रपटात शाहरुख हा 5 वेगवेगळ्या अवतारांमध्ये दिसला आहे. याशिवाय त्यानं या चित्रपट दुहेरी भूमिकाही साकारली आहे. नयनतारा ही 'जवान'मध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अ‍ॅटली यांनी केलं आहे. 'जवान'मध्ये शाहरुख खान आणि नयनतारा व्यतिरिक्त दीपिका पदुकोण आणि विजय सेतुपती, सान्या मल्होत्रा, योगी बाबू, सुनील ग्रोव्हर, प्रियमणी, संजय दत्त, रिद्धी डोगरा आणि गिरिजा ओक हे कलाकार आहेत.

हेही वाचा :

  1. Ridhi Dogra On Jawan : 'जवान'मध्ये शाहरुखच्या आईची भूमिका साकारत असलेल्या रिद्धी डोगरानं शेअर केला अनुभव...
  2. Ganesh Festival 2023 : ढोल-ताशा महोत्सवाचा जल्लोष; जाणून घ्या, 'नाशिक ढोल'चा इतिहास
  3. Elvish Yadav Song : उर्वशी रौतेलासोबत 'हम तो दिवाने' म्यूझिक अल्बममध्ये झळकणार एल्विश यादव....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.