ETV Bharat / entertainment

Kartik Aaryan : विराट कोहलीच्या शतकानंतर कार्तिक आर्यनचं अनोखं सेलेब्रिशन - कार्तिकनं आवडता केक खाल्ला

Kartik Aaryan : भारत आणि दक्षिण आफ्रिका विश्वचषक सामना हा 5 नोव्हेंबर रोजी झाला. या सामन्यात विराट कोहलीनं आपले 49 वे शतक झळकावले. त्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यननं या शतकाचं अनोख्या स्टाईलमध्ये सेलेब्रिशन केलंय.

Kartik Aaryan
कार्तिक आर्यन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 6, 2023, 12:38 PM IST

मुंबई - Kartik Aaryan : कोलकात्याच्या ईडन गार्डनवर 5 नोव्हेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषक सामना झाला. भारतानं सलग 8 वा विजय नोंदवला आहे. क्रिकेट विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात विराटनं आपले 49 वे शतक झळकावल्यानंतर, बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यन, त्याच्या कामगिरीनं रोमांचित झाला. कार्तिकनं एक स्वादिष्ट केक खाऊन हा आनंद साजरा केला आहे. या सामान्यामध्ये विराटनं 49 वे शतक झळकावून सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली आहे. त्यानंतर अनेकजण खूप खूश झाले आहेत.

विराटच्या शतकाचं सेलेब्रिशन: 5 नोव्हेंबर रोजी विराट कोहलीनं आपला 35 वा वाढदिवस साजरा केला. या दिवशी त्यानं त्याच्या चाहत्यांना सर्वात मोठी भेट दिली आहे. दरम्यान कार्तिकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक हसताना फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये तो बेकरीमध्ये चविष्ट केक आणि चमचा हातात घेऊन उभा आहे. याशिवाय यावेळी तो कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. कार्तिकनं निळ्या डेनिम आणि कॅपसह पांढरा टी-शर्ट घातला आहे. या पोस्टवर त्यानं कॅप्शनमध्ये लिहलं, 'विराटने शतक केले तर चिटींग तर नक्कीच होऊ शकते' (विराटने सेन्चुरी की है तो चिटिंग तो बनती है) त्याच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून त्याच्या फोटोचे कौतुक करत आहे.

कार्तिकच्या फोटोवर चाहत्यांनी केल्या कमेंट : कार्तिकच्या या पोस्टवर एका चाहत्यानं लिहलं, 'वर्ल्डकप संपता संपता आणखी 3 वेळा चिटींग होऊ शकते' दुसऱ्या एकानं लिहलं, 'विराटचा वाढदिवस आहे आणि केक हा खात आहे'. आणखी एकानं लिहलं, 'केक खाल्यानंतर जास्त वर्कआऊट कर' अशा अनेक कमेंट त्याच्या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी देखील पोस्ट करत आहेत. कार्तिकच्या वर्क्रफंट बोलायचं झालं तर तो शेवटी 'सत्यप्रेम की कथा'मध्ये कियारा अडवाणीसोबत दिसला होता. सध्या तो दिग्दर्शक कबीर खानच्या 'चंदू चॅम्पियन' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये गुंतलाआहे. या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2024 मध्ये सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Elvish Yadav Snake Venom Case : एल्विश यादवची चौकशी करणाऱ्या पोलीस स्टेशन प्रभारीची उचलबांगडी
  2. virat kohli : 'जवान' दिग्दर्शक अ‍ॅटलीनं दिली विराट कोहलीच्या डान्सवर प्रतिक्रिया
  3. Elvish yadav case : यूट्यूबर एल्विश यादव म्हणाला, 'माझी श्रीरामजींवर श्रद्धा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.