ETV Bharat / entertainment

अल्लू अर्जुनच्या बट्टा बोम्मा रिमेकसाठी शूट करत असताना कार्तिक आर्यनला वेदना - अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे

कार्तिक आर्यनने सोमवारी एक फोटो शेअर केला ज्यामध्ये तो वेदना कमी करण्यासाठी बर्फाच्या पाण्यात पाय भिजवताना दिसत आहे. अभिनेता अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे यांच्या आगामी शेहजादा चित्रपटासाठी बट्टा बोम्मा गाण्याच्या हिंदी आवृत्तीसाठी शूटिंग करत होता.

कार्तिक आर्यनला वेदना
कार्तिक आर्यनला वेदना
author img

By

Published : Jan 10, 2023, 10:05 AM IST

मुंबई - शेहजादा चित्रपटातील एका गाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शूटिंग केल्यानंतर अभिनेता कार्तिक आर्यनच्या पायाच्या स्नायूमध्ये प्रचंड वेदना होत आहेत. सोमवारी रात्री कार्तिकने इंस्टाग्रामवर वेदना कमी करण्यासाठी बर्फाच्या पाण्यात पाय भिजवतानाचा फोटो शेअर केला.

घुटने टूट गए..आइस बकेट चॅलेंज 2023 आता सुरू होत आहे. शेहजादा गाण्याच्या शुटिंगच्यावेळी स्नायूमधून वेदना जाणावल्या, असे त्याने पोस्टला कॅप्शन दिले. कार्तिकने अपडेट शेअर करताच, त्याच्या चाहत्यांनी कमेंट विभागात प्रतिक्रियांचा वर्षाव केला आणि त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्तिक काळजी घे, एका सोशल मीडिया युजरने टिप्पणीमध्ये लिहिले. माझा हिरो लवकर बरा होवो, असेही एका चाहत्याने लिहिले.

अलिकडच्या बातम्यामुसार कार्तिक आर्यन बट्टा बोम्माच्या रिमेकसाठी शूटिंग करत आहे. तेलुगूमध्ये रिलीज झाल्यावर हे गाणे सुपरहिट झाले होते. अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे या गाण्याला YouTube वर 810 दशलक्ष पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. असे दिसते की, हे गाणे त्याच्या चाहत्यांसाठी एक उल्लेखनीय ट्रीट बनवण्यासाठी सर्व काही देत आहे. बट्टा बोम्माची हिंदी आवृत्ती गणेश आचार्य यांनी कोरिओग्राफ केली आहे. अलीकडेच कार्तिकने गणेश आचार्य आणि शेहजादा दिग्दर्शक रोहित धवन यांच्यासोबतची एक फोटो देखील शेअर केला होता.

शेहजादाचे निर्माते 12 जानेवारी 2023 रोजी चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरचे अनावरण करण्यासाठी सज्ज आहेत. हा ट्रेलर भारतातील 3 शहरांमध्ये तीन दिवस मोठ्या प्रमाणावर लॉन्च केला जाईल. या चित्रपटात क्रिती सेनॉन, मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय आणि सचिन खेडेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत आणि हा चित्रपट १० फेब्रुवारी २०२३ रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शेहजादा हा अल्लू अर्जुनच्या आला वैकुंठापुरमुलूचा हिंदी रिमेक आहे.

शेहजादासोबत, कार्तिक त्याच्या करिअरमध्ये एक नवीन अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. बॉक्स ऑफिसवर सोनेरी कामगिरी करणारा हा अभिनेता निर्माता बनण्याच्या तयारीत आहे. सोमवारी, शहजादाच्या निर्मात्यांनी कार्तिकच्या निर्मितीमध्ये प्रवेशाची घोषणा करणारे एक निवेदन जारी केले. तो भूषण कुमार आणि अल्लू अरविंद यांच्यासोबत शेहजादाची सहनिर्मिती करणार आहे.

रोहित धवन दिग्दर्शित शेहजादा - वरुण धवनचा मोठा भाऊ रोहित धवन याने 'शेहजादा' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'शेहजादा' हा रोमँटिक-ड्रामा चित्रपट आहे. याआधी हा चित्रपट नोव्हेंबर २०२२ ला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार होता, पण नंतर काही कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली.''शेहजादा' हा दक्षिण सुपरस्टार अल्लू अर्जुनचा 2020 चा सुपरहिट तेलगू चित्रपट अला वैकुंठापुरमुलूचा अधिकृत हिंदी रिमेक आहे. 'आला वैकुंठपुरमुलू'मध्ये अभिनेत्री तब्बूही महत्त्वाच्या भूमिकेत होती.'शेहजादा'मध्ये कार्तिक बंटू नावाच्या व्यक्तिरेखेची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत क्रिती सेनॉनची जोडी पुन्हा एकदा पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.