ETV Bharat / entertainment

"स्वतःला वादांपासून दूर ठेवण्याचा मंत्र जपणार", करीना कपूरचा 2024 साठी दृढ निश्चय - Kareena Kapoor Sankalp

Kareena Kapoor mantra : अभिनेत्री करीना कपूरने नवीन वर्षात केलेला संकल्प सर्वांचे लक्ष वेधत आहे. 2024 मध्ये स्वतःला कोणत्याही वादापासून दूर ठेवायचे तिनं ठरवलं आहे. सध्या ती कुटुंबासह युरोपमध्ये 2023 ला निरोप देण्यासाठी गेली आहे.

Kareena Kapoor mantra
करीना कपूर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 30, 2023, 10:07 AM IST

मुंबई - Kareena Kapoor mantra : अनेकजण नवीन वर्षात वेगवेगळे संकल्प करत असतात, त्याप्रमाणे बॉलिवूड सेलेब्रिटीही पुढील वर्षभरात काय करायचे आणि काय नाही करायचे याचाही प्रण करतात. असाच काहीसा प्रकार करीना कपूरच्या निश्चयाच्या बाबतीत दिसतोय. तिने आगामी 2024 मध्ये स्वतःला कोणत्याही वादापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा निर्धार केला आहे.

करीनानं इन्स्टाग्रामवर एक खूप वेगळी पोस्ट लिहिली आहे. ज्याच्यावर नेटिझन्स अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिनं लिहिलंय, "मी माझ्या आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर आहे जिथे मी स्वतःला वादांपासून दूर ठेवते. तुम्ही मला 1+1 = 5 सांगितले तरीही तुम्ही अगदी बरोबर आहात, आनंद घ्या," असं तिनं पोस्टमध्ये लिहिले आहे. तिने या पोस्टला "2024 मंत्र" असे कॅप्शन दिले आहे.

Kareena Kapoor mantra
करीना कपूरचा 2024 साठी दृढ निश्चय

दरम्यान, करीना कपूर सध्या पती सैफ आणि मुलांसह युरोपमधील निसर्गरम्य ठिकाणी 2023 ला निरोप देण्यासाठी गेली आहे. ती सध्या स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. तिने नुकतेच तिच्या बर्फाळ प्रवासातील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये करीना खिडकीतून पर्वतांचे फोटो घेताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलंय, "प्रकाशाचा वेध, 4 दिवस ते 2024."

Kareena Kapoor mantra
करीना कपूर खिडकीतून फोटो घेताना

आणखी एका फोटोत करीना नताशा पूनावालासोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिनं लिहिलंय, "अशा प्रकारे आम्ही बर्फातही उबदार राहतो."

Kareena Kapoor mantra
करीना नताशा पूनावालासोबत पोज देताना

अलीकडेच करीना खान पती सैफ अली खान आणि मुलांसह ख्रिसमस साजरा करण्यासाठी लंडनला रवाना झाली होती. करिनाने टॉटेनहॅम हॉटस्पर स्टेडियममध्ये फुटबॉल सामनाही पाहिला. तिचा पती सैफ आणि मुलगा तैमूरचा या मैदानातील एक फोटोही तिनं शेअर केला आहे.

Kareena Kapoor mantra
फुटबॉल स्टडियमवर सैफ अली कुटुंब

करीना आणि सैफच्या लग्नाला 11 वर्षे झाली आहेत. दोघांनी LOC कारगिल (2003) आणि ओंकारा (2006) या चित्रपटामध्ये एकत्र काम केले होते. परंतु 2008 मध्ये आलेल्या टशन चित्रपटाच्या सेटवरच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि 16 ऑक्टोबर 2012 रोजी दोघांनी लग्नगाठ बांधली. 2016 मध्ये त्यांना तैमुर हा पहिला मुलगा झाला व पाच वर्षानंतर फेब्रुवारी 2021 मध्ये त्यांनी जेहचे स्वागत केले. सैफने करिनाच्या आधी अमृता सिंगशी लग्न केले होते आणि त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत.

कामाच्या पातळीवर करीना आगामी काळात क्रिती सेनॉन, तब्बू आणि दिलजीत दोसांझ यांच्यासोबत 'द क्रू'मध्ये दिसणार आहे. तिच्याकडे रोहित शेट्टीचा 'सिंघम अगेन' हा चित्रपट देखील आहे. यामध्ये ती अजय देवगण, दीपिका पदुकोण, अक्षय कुमार, रणवीर सिंग आणि इतर कलाकारांसोबत काम करत आहे.

हेही वाचा -

  1. 'कल्की 2898 एडी' चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन आयआयटी बॉम्बे टेकफेस्टसाठी सज्ज
  2. 'हे नुकसान कधीही भरून न येणारं': रजनीकांत यांनी डीएमडीके प्रमुख विजयकांत यांना वाहिली अखेरची श्रद्धांजली
  3. अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली मजेशीर पोस्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.