मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर सध्या कौटुंबीक सहलीवर आहे हे तर तिच्या चाहत्यांना माहिती आहे. आता तिने इटलीमधील नवरा आणि मुलांसोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिने आपल्या हॉलिडे डायरीतील आणखी काही अप्रतिम फोटो चाहत्यांठीसोशल मीडियावर टाकले आहेत.
करीना आणि सैफ हे नेहमीच आपल्या मुलाबाळांसोबत उत्तम वेळ घालवत असतात. भरपूर काम केल्यानंतर हे जोडपे त्यांच्या आवडत्या स्थळांना भेटी देण्यासाठी जाताना अनेक वेळा विमानतळावर दिसत असते आणि आता ते इटलीमध्ये पोहोचले आहेत. सैफ अली खान सोशल मीडियापासून थोडे अंतर राखून असतो, मात्र करीना आपल्या चाहत्यांना सुट्टीची व रोजच्या कामांची झलक शेअर करुन त्यांच्या संपर्कात राहण्याचा नेहमी प्रयत्न करत असते.
शुक्रवारी बेबो म्हणजेच करीनाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर इटली सहलीतील फोटो शेअर केले. आकाशाचे विलोभनिय दृष्य दाखवताना करीना सुंदर पोज देताना एका फोटोत दिसत आहे. इटलीच्या वातावरणात उबदार राहण्यासाठी तिने डेनीमच्या जोडीसह टी शर्ट आणि काळ्या रंगाची शॉल पांघरली आहे. या कपड्यात ती खूपच देखणी दिसत आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने गुलाबी ढग आणि मी अशा आशयाचे कॅप्शन दिलंय. तिने ट्रेनच्या प्रवासातील फोटोत म्हटलंय की, 'माझ्या खिडकीतून मी ढगातून चालते असं वाटतंय.'
कामाचा विचार करता करीना कपूरने अलिकडेच द क्रू या चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले. यात ती अभिनेत्री तब्बू आणि क्रिती सेनॉनसह स्क्रिन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. एकता कपूर आणि रिहा कपूर यांनी संयुक्तपणे निर्मिती केलेल्या द क्रू चित्रपटात करीनाचा उडता पंजाब चित्रपटातील सहकलाकार दिलजीत दोसंज याचीही भूमिका असेल. सुजॉय घोषच्या द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एस चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीमध्ये करीना कपूर काम करत आहे. करीनाचा हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेला द बंकिमहम मर्डर्स हा मर्डर मिस्ट्री चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.
हेही वाचा -
२. Mi 7 Collection Day 2 : 'मिशन इम्पॉसिबल ७' या चित्रपटाची जादू भारतीय बॉक्स ऑफिसवर कायम...