मुंबई : सैफ अली खान आणि करीना कपूर, बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. नुकतेच मुंबई वांद्रेमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेर या जोडप्याला स्पॉट करण्यात आले. त्यांच्यासोबत करिश्मा कपूर आणि अंकल कुणाल कपूर हे देखील उपस्थित होते. शुक्रवारी रात्री पापाराझीने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये करीना, सैफ अली खान, करिश्मा आणि कुणाल एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये करीना सैफच्या एखाद्या गोष्टीवर हसताना दिसत आहे. शिवाय यावेळी पापाराझीच्या फोटोग्राफरला करिनाने आणि कुणाल कपूरने पोझही दिली. करिनाने यावेळी पांढरा कुर्ता, काळी पँट आणि मॅचिंग सँडल परिधान केली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
करिनाने दिली पापाराझीना पोझ : सैफ यावेळी ब्लॅक शर्ट आणि डेनिममध्ये दिसला. करिश्मा ही ब्लॅक टॉप, स्कर्ट आणि ब्लॅक हिल्समध्ये यावेळी दिसली. तसेच कुणाल कपूर हा निळ्या कुर्ता आणि पायजमामध्ये होते. डिनरचा आनंद घेत असताना, करिश्माने तिच्या सोशल मीडिया स्टोरीमध्ये रेस्टॉरंटमध्ये काढलेले काही फोटोही शेअर केले. एक फोटो तिने तिच्या आवडत्या खाद्यपदार्थाचा शेअर केला असून त्यात तिने लोलो लव्हज असे लिहिले आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती लिफ्टमध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत करिश्माने लिहिले, 'बर्याच दिवसांनी लिफ्ट'. अशी तिने पोस्ट केली आहे.
वर्कफ्रंट : करिश्माच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच ब्राउन या आगामी मालिकेत दिसणार आहे. याशिवाय ती दिग्दर्शक होमी अदजानिया यांच्या मर्डर मुबारक या चित्रपटात दिसणार आहे. ज्यामध्ये सारा अली खानही तिच्यासोबत दिसणार आहे. त्याचबरोबर सैफचा हा आदिपुरुष या चित्रपटात रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर करीना ही तब्बू, क्रिती सेनन आणि दिलजीत दोसांझसह 'क्रूम' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. याशिवाय ती सुजॉय घोषच्या एका थ्रिलर चित्रपटात झळकणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत विजय वर्मा आणि जयदीप अहलावत हे देखील दिसणार आहेत. याव्यतिरिक्त ती हंसल मेहताच्या चित्रपटामध्ये दिसणार आहे, ज्याचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही.
हेही वाचा :
- Mani Ratnam and Ilayaraaja birthday : दिग्दर्शक मणिरत्नम आणि इलायराजा यांना मुख्यमंत्री स्टॅलिन आणि कमल हासन यांनी दिल्या शुभेच्छा
- SRK and Salmans video viral : सलमान खान आणि शाहरुख खानचा लीक झालेला व्हिडिओ व्हायरल, क्लिप टायगर ३ असल्याचा चाहत्यांचा अंदाज
- Amber Heard quitting Hollywood : जॉनी डेपसोबत खटला हरल्याने हॉलिवूड सोडल्याचे वृत्त अंबर हर्डने फेटाळले