मुंबई - Kareena Kapoor Khan : करीना कपूर सध्या ओटीटीवरील तिच्या 'जाने जान' चित्रपटामुळं चर्चेत आहे. हा करिनाचा ओटीटी डेब्यू चित्रपट आहे, ज्याचं ती जोरदार प्रमोशन करतेय. अलीकडेच ती एका मुलाखतीत आपल्या करियर, लग्न आणि मुलाच्या नावाच्या वादावर मोकळेपणानं बोलताना दिसली. या मुलाखतीत तिनं सैफ अली खानसोबत लग्न केल्यामुळं तिला किती ट्रोल केलं होतं याबद्दल सांगितलं. करिनाच्या म्हणण्यानुसार, दोघांमधील वयाच्या 10 वर्षांच्या फरकानं त्यांना काही फरक पडत नाही. याशिवाय त्यांचं धर्म वेगळे आहेत याकडे त्यांनी कधीही लक्ष दिलं नाही. पुढं तिनं सांगितलं, लोक आंतर-धर्मीय संबंधांवर चर्चा करण्यात जास्त वेळ घालवतात. मात्र आम्हाला या गोष्टींनी काहीही फरक पडत नाही.
वयातील फरकामुळं झाली होती ट्रोल : करीनाला जेव्हा विचारण्यात आलं की, तिच्या वयातील फरकामुळं तिला ट्रोल करणार्या ट्रोल्सला ती काय म्हणेल, तेव्हा तिनं उत्तर दिलं, वयाचा फरक कुठे आहे, तो नेहमीपेक्षा जास्त हॉट आहेत. मला आनंद आहे की मी 10 वर्षांनी लहान आहे, त्याने माझी काळजी घ्यावी, मला असं वाटतं. तो 53 वर्षांचा आहे, असं वाटत नाही. वयामुळे काही फरक पडत नाही. आदर , प्रेम आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या सहवासाचा आम्ही आनंद घेतो, हे महत्त्वाचं आहे. करीनानं पुढं सांगितलं, सैफला काळजी वाटत होती की तो तिच्या उत्साहाशी जुळवू शकेल की नाही. सैफ आणि माझ्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांना पसंत करतो. तो कोणता धर्म पाळतो किंवा त्याचं वय काय हे महत्त्वाचं नाही, हा चर्चेचा विषयही नाही.
करीना कपूर खानने तैमूर या नावाबद्दल सांगितले : करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचं 2012 साली लग्न झालं. 2016 मध्ये, या जोडप्यानं त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं, ज्याचं नाव त्यांनी तैमूर ठेवलं. बेबोनं तिच्या पहिल्या मुलाच्या, तैमूरच्या नावावरून झालेल्या वादाबद्दल देखील सांगितलं. बाळाचं नाव 'तैमूर' ठेवल्यानं सोशल मीडियावर लोकांनी करीना आणि सैफला ट्रोल केलं होतं. तिनं आपल्या मुलाचं नाव तैमूर का ठेवले याचा खुलासा करत सांगितलं की, माझ्या मुलाच्या नावाचा अर्थ 'आयर्न मॅन' आहे. तैमूर हे सैफच्या पहिल्या मित्राचं नाव आहे. मुलाच्या नावावरून ट्रोल केल्यामुळे तिला खूप त्रास झाला, असं तिनं यावेळी सांगितलं. करीनाची मुलं तैमूर आणि जेह अनेकदा त्यांच्या आयाबरोबर दिसतात. करीनानं पुढं सांगितलं की, एकदा तैमूरनं विचारलं होतं की, आया वेगळ्या टेबलवर बसून का जेवतेय? तेव्हापासून त्याची आयादेखील आमच्या कुटुंबाबरोबर एकाच टेबलावर बसून जेवतात. हा आता घरचा नियम झाला आहे.
हेही वाचा :
- Fukrey 3 Song Out: 'फुक्रे 3' चित्रपटामधील पहिलं ट्रॅक झालं प्रदर्शित ; गाणं झाल व्हायरल....
- Dharmendra Health : बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी अमेरिकेला रवाना
- Pooja Bhatt And Shah Rukh Khan : पूजा भट्टनं वडील महेश भट्टसोबतच्या किसबद्दल केला खुलासा; शाहरुख खाननं दिली होती 'ही' प्रतिक्रिया...