ETV Bharat / entertainment

3 Idiots Sequel : आमिर खानला फटकारताना करीना कपूरने केली 'ही' चूक; 3 इडियट्सच्या सिक्वेलचे उघडले रहस्य - आर माधवन

आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी स्टारर 3 इडियट्स 2009 मधील अपडेट्स समोर आले आहेत. चित्रपटाची अभिनेत्री करीना कपूरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये काय म्हणाली घ्या जाणून...

3 Idiots Sequel
3 इडियट्सच्या सिक्वेलचे उघडले रहस्य
author img

By

Published : Mar 24, 2023, 4:28 PM IST

नवी दिल्ली: राजकुमार हिरानी यांचा 3 इडियट्स हा चित्रपट अनेकांच्या पसंतीचा चित्रपट आहे. 2009 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होतो. या चित्रपटाला येऊन बराच काळ लोटला असला तरी कथा आणि मनोरंजनाच्या बाबतीत 3 इडियट्स नेहमीच हृदयाला भिडणारा चित्रपट राहील. आता या चित्रपटाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे, जी ऐकून चाहत्यांना आनंद होईल.

करीना नाराज का झाली : करीना कपूरने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती 3 इडियट्सबद्दल बोलताना दिसत आहे. परंतु अभिनेत्री देखील खूप नाराज दिसत आहे. करीना कपूर चित्रपटातील नायक आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्यावर खूप नाराज आहे आणि तिघांनाही फटकारते आहे. यासोबतच 3 इडियट्सच्या सिक्वेलची कबुलीही दिली आहे. या व्हिडिओमध्ये करीना कपूरने 3 इडियट्सच्या सिक्वेलबद्दल थेट आणि स्पष्ट शब्दात काहीही सांगितलेले नाही, पण तिचे म्हणणे ऐकून सोशल मीडियावरील युजर्सनी या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

करीनापासून काहीतरी लपवले आहे : व्हिडिओमध्ये करीना कपूर, आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्याबद्दल बोलताना ती म्हणते की, नुकतीच ती सुट्टीवर असताना या तिघांनीही पत्रकार परिषद घेतली. यानंतर या तिघांनीच पत्रकार परिषद का घेतली, असा प्रश्न तिला पडला आहे. हे तिघे मिळून काय तरी गुपित रचत आहेत आणि ते आमच्यापासून लपवत आहेत, असे करीना म्हणाली.

सिक्वेलचे नियोजन सुरू आहे? नाराजी व्यक्त करताना करीना पुढे म्हणते की हे लोक काय सिक्वेलचे प्लॅन करत आहेत आणि तेही माझ्याशिवाय. हे लोक मला कसे विसरतील? बोमन इराणीचा संदर्भ देत अभिनेत्री पुढे म्हणते की बोमनला ही गोष्ट माहीत आहे का, मला त्याला सांगायचे आहे की, जे काही चालले आहे ते हे एक सिक्वेलसारखे दिसते आहे.

हेही वाचा : Akshay Kumar Injured : 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या सेटवर अक्षय कुमार झाला जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.