ETV Bharat / entertainment

सलमान खानऐवजी करण जोहर होस्ट करणार 'बिग बॉस 17' चा वीकेंड का वार? - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान

Karan Johar to host Bigg Boss 17 : बिग बॉस 17 च्या आगामी वीकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खानऐवजी दिग्दर्शक करण जोहर होस्ट म्हणून येणार आहे. यापूर्वी बिग बॉस ओटीटी सीझन 1 चे संपूर्ण सीझन होस्ट केले होते. त्यामुळे तो स्पर्धकांची कशी शाळा घेणार हे पाहणं मजेशीर असणार आहे.

Karan Johar to host Bigg Boss 17
'बिग बॉस 17' चा वीकेंड का वार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 29, 2023, 4:18 PM IST

मुंबई - Karan Johar to host Bigg Boss 17 : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खाननं होस्ट केलेला लोकप्रिय रिआलिटी शो बिग बॉसचे 17 वे पर्व प्रत्येक एपिसोडसह नाट्मय होत आहे. वीकेंड का वार दरम्यान सलमान खान स्पर्धकांची ज्या प्रकारे हजेरी घेतो, त्यांना घडे शिकवतो ते पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र या आठवड्यातील वीकेंड का वारच्या वेळी सलमान खान होस्ट करणार नसल्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले आहेत.

चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर वीकेंड का वार एपिसोडमध्ये बिग बॉस 17 चा होस्ट म्हणून येण्यासाठी सज्ज झाला आहे. सलमानच्या अनुपस्थितीत करण जोहर शोमध्ये त्याचा अनोखा जलवा दाखवणार आहे. करण जोहरची आपली एक खास स्टाईल आहे. तो फिरकी घेतानाही समोरच्याला थेट न दुखवता सहज खिल्ली उडवू शकतो. त्याचा हजरजबाबीपणा सर्वश्रृत आहे.

करण जोहरने यापूर्वी बिग बॉस ओटीटीचा संपूर्ण पहिला सीझन होस्ट केला होता. सडेतोड बोलण्यामुळं चाहत्यांना त्याचं होस्ट म्हणून वावरणं आवडलं होतं. बिग बॉस ओटीटी सीझन 1 च्या पहिल्या वीकेंड का वारमध्ये करण जोहरनं दिव्या अग्रवालला तिच्या वागण्याबद्दल चांगलंच झापलं होतं. या वीकेंडला करण कोणाची कशी शाळा घेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

या आठवड्यात बिग बॉसचा शो मनोरंजन आणि अनेक नाट्यमय घडामोडींनी भरलेला होता. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांना त्यांच्या पालकांशी बोलण्याची संधी मिळाली. वादग्रस्त बनलेल्या नील भट्टला संपूर्ण सिझनसाठी नॉमिनेट करण्यात आलं आहे. त्यामुळे हा आठवडा वादग्रस्त ठरला होता. ओरहान अवत्रामणी यांनं प्रेक्षक आणि स्पर्धकांचंही चांगलंच मनोरंजन केलंय.

अनुराग डोभाल यानं स्वेच्छेने बाहेर पडण्याची इच्छा बिग बॉसला बोलून दाखवली आहे. यासाठी तो बिग बॉसकडे दंड भरायलाही तयार आहे. विकी जैन आणि अभिषेक कुमार यांनी त्यांचे मतभेद थोडे बाजूला ठेवले आहेत. नील भट्ट आणि अंकिता लोखंडे यांच्यातले मतभेद तर जगजाहीर आहेत. त्यामुळे या आठवड्यात करण जोहर कोणत्या विषयांवर भाष्य करेल हे पाहणे रोमांचकारी ठरेल.

1. हृतिक रोशन आणि जूनियर एनटीआर स्टारर 'वॉर 2' रिलीज होईल 'या' दिवशी

2. रणदीप हुड्डा आणि लिन लैश्रामच्या प्री वेडिंग सेलिब्रेशनचे फोटो झाले व्हायरल

3. चित्रपट फ्लॉपची जबाबदारी माझी तर हिटचं श्रेय टीमला जातं : सलमान खान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.