ETV Bharat / entertainment

Kanhaiya Twitter Pe Aaja Song troll :विकी कौशलचे 'कन्हैया ट्विटर पे आजा' गाणे ट्रोल, भजन कुमारवर प्रेक्षकांचे टीकास्त्र - कन्हैया ट्विटर पे आजा गाणे ट्रोल

'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटातील पहिले गाणे 'कन्हैया ट्विटर पे आजा' हे प्रदर्शित झाले आहे. गाणे रिलीज झाल्यानंतर लगेचच काहींना खटकले आणि त्यांनी टीका करायाला सुरुवात केली. यामुळे या चित्रपटासह गाण्याच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

THE GREAT INDIAN FAMILY
द ग्रेट इंडियन फॅमिली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 3:50 PM IST

Updated : Aug 30, 2023, 6:49 PM IST

मुंबई : विक्की कौशल आणि मानुषी छिल्लर स्टारर 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेल्या 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. आज रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी 'द ग्रेट इंडियन फॅमिली' मधील 'कन्हैया ट्विटर पे आजा' हे गाणे रिलीज केले आहे. या गाण्यामध्ये विक्की कौशल स्टेजवर गाताना आणि डान्स करताना दिसत आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली'मध्ये विक्की हा भजन कुमार नावाच्या गायकाच्या भूमिकेत झळकला आहे. मात्र काही प्रेक्षकांनी गाण्याविरोधात वेगळा सूर आळवायला सुरूवात केली आहे. काही लोकांना हे गाणे आवडले नसल्याचे यावरुन दिसत आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'कन्हैया ट्विटर पे आजा' गाणे ट्रोल - गाण्यातील भजन कुमार बनलेला विकी कौशल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. 'कन्हैया ट्विटरवर पे आजा' गाणे रिलीज झाल्यानंतर लगेचच ट्रोल व्हायला सुरुवात झाली. अनेकांना हा थिल्लरपणा वाटत आहे तर अनेकांनी गाण्याची खिल्ली उडवली आहे. यातील विकी कौशलचा गेटअप, केशभूषा वरुनही काहीजण व्यक्त होत आहेत. या गाण्यावर कमेंट करत एका युजरने लिहले,' बॉलिवूडला लाज वाटायला पाहिजे नेहमी हिंदूच्या देवांवर अशी गाणे काढतात' दुसऱ्या एकाने कमेंट करत लिहले, 'किती खराब गाणे आहे आज काल बॉलिवूडला काय झाले आहे' आणखी एकाने यावर लिहले, 'देवांचा सर्वांनी मजाक बनून ठेवला आहे, काय ऐकाव लागत आहे' अशा अनेक कमेंट यावर येत आहे. याशिवाय काहीजण या गाण्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.

'कन्हैया ट्विटर पर आजा'च्या समर्थानार्थ उतरले चाहते: हे गाणे ट्विटर प्रदर्शित होताच काही जाणांनी ट्रोल करायला सुरुवात केली असली तरी विकी कौशलच्य चाहत्यांनी या गाण्याचे समर्थन करायाला सुरुवात केली. एका चाहत्याने या पोस्टवर कमेंट करत लिहले, 'वाह अप्रतिम विक्की भाई.' तर आणखी दुसऱ्या चाहत्याने लिहले, 'खूप छान' अशा अनेक कमेंट या गाण्यावर येत आहे. याशिवाय 'कन्हैया ट्विटर पर आजा' या गाण्यावर अनेकजण प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. हे गाणे गायक नकाश अझीझने गायले आहे. 'कन्हैया ट्विटर पर आजा' या गाण्याला संगीत प्रीतमने दिले आहे. याशिवाय अमिताभ भट्टाचार्य यांनी गाण्याचे बोल लिहले आहे. विकी कौशल हा बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारत असतो. यापूर्वी विक्कीने अनेक वेगवेगळ्या भूमिका रूपेरी पडद्यावर साकारल्या आहेत. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपटाचे दिग्दर्शन कृष्णा आचार्य यांनी केले आहे.

मानुषी छिल्लर दिसणार मुख्य भूमिकेत : विक्की कौशलसोबत पहिल्यांदाच मानुषी रूपेरी पडद्यावर दिसेल. या चित्रपटासाठी ती खूप उत्सुक आहे. याआधीही मानुषी ही यशराज बॅनरखाली बनलेल्या 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटात अक्षय कुमारसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता, त्यामुळे मानुषीला 'द ग्रेट इंडियन फॅमिली' या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहे. 'द ग्रेट इंडियन फॅमिली' हा चित्रपट रूपेरी पडद्यावर 22 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Shreya Ghoshal in Indian Idol : इंडियन आयडॉलमध्ये 'स्पर्धक ते परीक्षक' प्रवास झाल्याने श्रेया घोषाल स्वतःला मानते धन्य
  2. Mamata Banerjee in Mumbai : ममता बॅनर्जी रक्षाबंधनासाठी 'जलसा'वर जाणार, अमिताभ बच्चन यांनी दिलं निमंत्रण
  3. Allu Arjun : Allu Arjun : अल्लू अर्जुनने शेअर केला 'पुष्पा 2'च्या सेटवरील रोमांचक अनुभव

Last Updated : Aug 30, 2023, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.