ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut criticizes : 'नेपो गँग कुठे दडलीय?', म्हणत कंगना रणौतची करण जोहरवर टीका - रॉकी और रानी की प्रेम कहानी

कंगना रणौतवर काहीच टीकात्मक होत नसल्याने तिला आश्चर्य वाटत आहे. याचाही संबंध ती करण जोहरशी लावत आहे. नेपो गँगने आपल्यावर काहीच कशी टीका किंवा बदनामी केली नाही असे म्हणत तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट लिहिली आहे.

Kangana Ranaut criticizes
कंगना रणौतची इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट
author img

By

Published : Jul 29, 2023, 3:09 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत निर्माता करण जोहरवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. करणला ती नेहमी घराणेशाहीचा मुख्य स्तंभ मानत आली आहे. 'कॉफी विथ करण'च्या एका एपिसोडमध्ये पहिल्यांदा थेट नेपोटिझमचा आरोप केल्यानंतर अनेक वर्ष या आरोपांचा पाठपुरवा ती करत आली आहे. गेली सहा वर्षे करण जोहर दिग्दर्शन करत नव्हता. आता तो 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटातून तो दिग्दर्शनात परत आला आहे. त्याचा चित्रपट रिलीज झाल्यानंतर कंगनाने पुन्हा त्याच्यावर निशाणा साधायचा प्रयत्न केला आहे. परंतु यावेळी तिने थेट नाव न घेता हल्ला बोल केला आहे.

कंगना रणौतची ही पोस्ट थेट नसली तरी करण जोहरशी संबंधीत आहे. कारण त्याचा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. कंगनाने लिहिलंय, 'माझ्याबद्दल सकाळपासून बिनबुडाची एकही नकारात्मक बातमी आलेली नाही. आणि कुणी मीडियाला खोटे उदाहरणही पाठवलेले नाही. माझ्या प्रोजेक्टबद्दल काहीच अफवाही पसरवली जात नाही आणि जुन्या चित्रपटातील माझे कामुक दृष्य प्रसारितही केले जात नाही. इतकी शांतता कशी काय आहे? कुठे लंकेत आग तर लागलेली नाही आहे ना? कोणी तरी शोधा की, आज नेपो गँग कुठं अडकली आहे?'

Kangana Ranaut criticizes
कंगना रणौतची इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट

आता कंगनाने उल्लेख केलेली 'नेपो गँग' म्हणजे कोण हे सूज्ञास अधिक सांगणे न लगे. करण जोहर आणि त्याच्याशी संबंधित सर्व कलाकार यांच्यावर कंगना नेहमी भडकलेली असते. 'रॉकी ऑर रानी की प्रेम कहानी'मध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. आलियावर टीका करण्यासाठी कंगनाला कोणतेही निमित्त लागत नाही. अलिकडे तिने आलिया आणि रणबीर कपूर यांचे लग्न खोटे असल्याचे म्हटले होते. ते दोघेही एका घरात राहतात पण ते वेगवेगळ्या बेडरुममध्ये झोपतात, असेही ती म्हणाली होती. करण जोहरने 'ब्रम्हास्त्र'सह तिने चित्रपटांचे आमिष दाखवल्यानंतर रणबीरने कराराचा भाग म्हणून आलियाशी लग्न केले होते, असाही तिने नवा शोध लावला होता. थोडक्यात करण जोहर आणि त्याच्याशी संबंधित लोक यांना ती 'नेपो गँग' म्हणते आणि त्यांच्यावर टीकास्त्र सोडते. तिच्याबद्दल कोणी काहीच टीका करत नाही म्हणटल्यावर तिने ही पोस्ट लिहून वाद उकरून काढायचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा -

१. Hemant Dhome : 'रॉकी और रानी...'मध्ये क्षिती जोगला पाहून हेमंत ढोमेला झाले आकाश ठेंगणे!!

२. RARKPK box office collection day 1 :'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली धमाकेदार कमाई...

३. Bawaal under fire : ओटीटीवरुन 'बवाल' चित्रपट काढून टाका, ज्यू संघटनेची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.