ETV Bharat / entertainment

कंगना रणौतने केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन

बॉलिवूडची 'धाकड' गर्ल कंगना रणौतने सोशल मीडियावर महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले आहे.

कंगना रणौत
कंगना रणौत
author img

By

Published : Jul 1, 2022, 5:06 PM IST

मुंबई : बॉलिवूडची 'धाकड' गर्ल कंगना रणौत कोणत्याही मुद्द्यावर आपले मत उघडपणे मांडते. महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ्या उलथापालथीवरून अलीकडेच या अभिनेत्रीने उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली होती. आता कंगना रणौत हिने सोशल मीडियावर एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. 'पंगा गर्ल'ने नवनियुक्त मुख्यमंत्र्यांचे खास अभिनंदन केले.

कंगनाने इंस्टाग्राम अकाऊंटवर एकनाथ शिंदे यांचा फोटो शेअर केला आणि लिहिले- 'यशाची किती प्रेरणादायी कहाणी आहे... ऑटो-रिक्षा चालवण्यापासून ते देशातील सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली व्यक्ती बनण्यापर्यंत... अभिनंदन सर.'

कंगना रणौतने केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन
कंगना रणौतने केले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन

गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याआधी महाराष्ट्रात फ्लोअर टेस्ट होण्याआधीच उद्धव ठाकरे यांचे सरकार पडले होते आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या संपूर्ण घटनेवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतने उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधत आपला राग व्यक्त केला होता.

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा कंगनाने एक व्हिडिओ पोस्ट करुन अप्रत्यक्ष उध्दव ठाकरे व शिवसेनेवर टीकेचा निशाणा साधला होता. या व्हिडिओत ती म्हणते, ''१९७५ नंतर भारताच्या लोकशाहीसाठी सर्वात महत्त्वाची वेळ आहे. १९७५ ला लोकनेता जेपी नायारण यांच्या सिंहासन सोडा या गर्जनेने सिंहासन सोडावे लागले होते. २०२० मध्ये मी म्हटले होते, लोकतंत्र एक विश्वास आहे. जे सत्तेच्या घमेंडीत हा विश्वास तोडतात त्याची घमेंड तुटणार हे निश्चित आहे. ही कोणत्या व्यक्ती विशेषची शक्ती नाही, ही शक्ती आहे एका प्रमाणिक चारित्र्याची. आणि दुसरी गोष्ट हनुमानजींना शिवाचा १२ वा अवतार मानले जाते आणि जेव्हा शिवसेनाच हनुमान चालीसावर बंदी आणते तेव्हा स्वतः शिवही वाचवू शकत नाहीत. हर हर महादेव, जय हिंद, जय महाराष्ट्र.'' असे कंगनाने आपल्या व्हिडिओत म्हटले आहे.

या व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमध्ये तिने हिंदीत लिहिलंय, ''जब पाप बढ़ जाता है, तो सर्वनाश होता है और उस के बाद सृजन होता है…''कंगनाच्या या व्हिडिओनंतर तिच्या समर्थकांनी दिला भरपूर प्रतिक्रिया देऊन तिच्या म्हणण्याला संमती दर्शवली आहे. कंगनाला काही महिन्यापासून केंद्र सरकारची व्हीआयपी सुरक्षा देण्यात आली आहे. कंगना नेहमी वादात आणि चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.

हेही वाचा - खतरों के खिलाडी 12: साहसी एरिका पॅकार्डचा ग्लॅमरस अवतार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.