ETV Bharat / entertainment

कंगना राणौतनं चेन्नईत सुरू केलं सायकॉलॉजिकल थ्रिलरचं शूटिंग, आर माधवनसोबत होणार पुनर्मिलन - कंगना रणौत

Kangana Ranaut commences shoot : कंगना रणौतनं तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याची बातमी चाहत्यांना दिलेय. 'थलायवी' चित्रपटाचं दिग्दर्शन केलेल्या ए.एल. विजय यांच्यासोबत तिनं आगामी चित्रपट सुरू केलाय. यामध्ये ती पुन्हा एकदा आर माधवनसोबत आठ वर्षांच्या अंतरानंतर पुन्हा एकत्र येणार आहे.

Kangana Ranaut commences shoot for psychological thriller
कंगना राणौतनं सुरु केलं शूटिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 18, 2023, 4:43 PM IST

मुंबई - Kangana Ranaut commences shoot : कंगना रणौतनं वीकेंडला सोशल मीडियावर तिच्या नवीन चित्रपटाबद्दलची बातमी शेअर केली. या प्रकल्पाबद्दलचे अधिक तपशील समजू शकलेले नाहीत. परंतु तिने अपारंपरिक खथानक असलेला थरारक चित्रपट असल्याचे संकेत दिलेत. तिनं एक मनोवैज्ञानिक थ्रिलरवर चित्रपटावर काम सुरू केलंय. या चित्रपटाचं दिग्दर्शन ए.एल. विजय करणार असून यापूर्वी त्यांच्या थलायवी या जयललीता यांच्या बायोपिकमध्ये कमगना रणैतनं मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटात कंगना आठ वर्षांच्या अंतरानंतर आर माधवनसोबत काम करणार असल्याचं सांगितलं जातंय.

  • Today in Chennai we started filming our new film, a psychological thriller.
    Other details coming soon.
    For now need all your support and blessings for this very unusual and exciting script 🙏 pic.twitter.com/GERsIYLsR7

    — Kangana Ranaut (@KanganaTeam) November 18, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चित्रपटाबद्दल अधिक काही न सांगता कंगनाने चित्रपटाबद्दल उत्साहानं सांगितलंय की, "चेन्नईमध्ये आम्ही आज नवीन चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं. हा एक सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट असणार आहे. चित्रपटाबद्दलचे अधिक तपशील लवकरच देत आहे. या अतिशय असामान्य आणि रोमांचक स्क्रिप्टसाठी सध्या मला तुमच्या सर्वांच्या समर्थनाची आणि आशीर्वादाची गरज आहे."

कंगनानं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर चेन्नईतील शूटिंगचा शुभ मुहूर्ताचा एक स्नॅपशॉट शेअर केला आहे. नवीन सुरू होणाऱ्या प्रोजेक्टसाठी तिनं चाहत्यांकडे आशीर्वाद मागितले आहेत. तिनं लिहिलंय, "आजपासून सुरू होणाऱ्या आमच्या नवीन प्रवासासाठी तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची गरज आहे."

कंगना रणौत अलिकडेच 'तेजस' चित्रपटामध्ये दिसली होती. यामध्ये तिनं हवाई दलाच्या पायलटची भूमिका साकारली होती. चित्रपटात अंशुल चौहान, वरुण मित्रा, आशिष विद्यार्थी आणि विशाक नायर यासारख्या दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फसला. या चित्रपटाकडून कंगनाला खूप अपेक्षा होत्या. याच्या प्रमोशनसाठी तिनं जीवाचं रान केलं होतं. इतकंच नाही तर केंद्रीय मंत्र्यापासून ते उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसाठीही तिनं शोचे प्रीमियर केले होते. परंतु प्रेक्षकांना प्रभावित करण्यात तिला यश आलं नाही. गेल्या काही वर्षापासून कंगनाला सतत अपयशाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे तिनं पुन्हा एकदा साऊथचा चित्रपट साईन करुन यश मिळवण्यासाठीची धडपड पुन्हा सुरू केलीय.

हेही वाचा -

  1. अभिजीत सावंतमुळं पक्षपात झाला, उपविजेत्या अमित सानाची इंडियन आयडॉलवर टीका

2. भर स्टेजवर सलमाननं केला इमरान हाश्मीचं चुंबन घेण्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल

3. सलमान आणि कतरिना कैफच्या 'टायगर 3' नं 200 कोटींचा टप्पा ओलांडला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.