ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut celebrates Holi : 'चंद्रमुखी २' च्या सेटवर कंगना रणौतने साजरी केली होळी - माजी पंतप्रधान इंदिरा गांधी

अभिनेत्री कंगना रणौतने चंद्रमुखीच्या सेटवर होळी साजरी केली. आपल्या क्रू मेंबर्सना तिने स्वतः रंग लावत मजा मस्ती केली. चित्रपटाच्या सेटवरील या होळी प्रसंगी कंगनाने पांढरी साडी नेसली होती.

Kangana Ranaut celebrates Holi
'चंद्रमुखी २' च्या सेटवर कंगना रणौतने साजरी केली होळी
author img

By

Published : Mar 8, 2023, 2:22 PM IST

मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत हिने बुधवारी 'चंद्रमुखी २' चित्रपटाच्या सेटवर होळीचा उत्सव साजरा केला.कंगानाने इन्स्टाग्रामवर तिच्या होळीच्या उत्सवांमधून एक व्हिडिओ टाकला आहे, ज्यामध्ये पाढऱ्या शुभ्र वस्त्रातील कंगना आपल्या क्रू मेंबर्सना रंग लावताना दिसत आहे आणि होळीच्या सणाचा आनंद वाढवताना दिसत आहे.

तिने शेअर केलेल्या व्हिडिओला 'चंद्रमुखीच्या सेटवर आज सकाळी होळी ...', असे या व्हिडिओला तिने कॅप्शन दिले आहे. अलीकडेच ती 'चंद्रमुखी २' च्या सेटवर परत आली आहे आणि चाहत्यांना तिच्या चित्रपटाच्या आगामी लूकची झलकही दाखवली आहे. 'माझ्या टीमसह चंद्रमुखी 2 या चित्रपटाच्या सेटवर परत. हा एक अतिशय नाट्यमय प्रसंग आहे आणि परिस्थिती अशी आहे की, आम्ही सर्वजण याबद्दल खूप उत्साही आहोत', असे तिने ट्विट केले.

पी वासू यांनी दिग्दर्शित केलेला 'चंद्रमुखी २' हा ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'चंद्रमुखी' या चित्रपटाचा सिक्वेल आहे ज्यात रजनीकांत आणि ज्योतिका या कलावंतांनी मुख्य भूमिकेत अभिनय केला होता. 'चंद्रमुखी २' मध्ये कंगना रणौत ही राजाच्या दरबारात असलेल्या नर्तकीच्या भूमिकेत आहे. तिचे सौंदर्य आणि नृत्य याचा तिला मोठा गर्व आहे. तामिळ अभिनेता राघवा लॉरेन्स चित्रपटात कंगनाच्या विरुद्ध मुख्य भूमिका साकारणार आहेत. चित्रपटाच्या अधिकृत रिलीज तारखेची अद्याप प्रतीक्षा आहे. या व्यतिरिक्त, कंगना आगामी काळात 'इमर्जन्सी' या राजकीय नाट्यमय चित्रपटातही दिसणार आहे. हा तिचा पहिला एकटीने दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्याभोवती गुंफलेला 'इमर्जन्सी' हा चित्रपट आणिबाणीच्या पार्श्वभूमीवर घडताना दिसतो. यात कंगना इंदिरा गांधीची भूमिका साकारताना दिसणार आहे. कंगना व्यतिरिक्त या चित्रपटात अनुपम खेर, महिमा चौधरी, विशक नायर आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कंगना रणौत आगामी 'तेजस' चित्रपटामध्येही दिसणार आहे ज्यात ती भारतीय एअरफोर्स पायलटच्या भूमिकेचे चित्रण करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या अधिकृत रिलीज तारखेची अद्याप प्रतीक्षा आहे. आगामी महिन्यांत, प्रेक्षक कंगनाला 'मणिकरनीका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ डिड' आणि 'द अवतार: सीता' मध्ये देखील पाहतील.

हेही वाचा - Queen Completes 9 Years : क्विनची ९ वर्षे पूर्ण, कंगनाने शेअर केली न्यूयॉर्क फिल्म अकादमीची आठवण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.