"काळोखाच्या पारंब्या" या मकरंद अनासपुरे दिग्दर्शित चित्रपटाला अत्यंत प्रतिष्ठित मॉस्को इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये बेस्ट फिचर फिल्म आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफी (सुरेश देशमाने) विभागात नामांकन प्राप्त झाले आहे. हा महोत्सव १० एप्रिल रोजी मॉस्को येथे दाखवला जाणार आहे.
" काळोखाच्या पारंब्या " या चित्रपटात मकरंद अनासपुरे एक महत्त्वपूर्ण भूमिकेत असून सॊबत वैभव काळे, काजल राऊत, राजा सोनवणे, प्रेषित रुद्रवार आणि पुरुषोत्तम चांदेकर आहेत. या चित्रपटाची निर्मिती मनोज पिलेवार ,मकरंद अनासपुरे, सुरेश देशमाने यांनी केलेली असून संगीत मिलिंद जोशी, ध्वनी उमर मुलांनी, रंगभूषा कुंदन दिवेकर, पटकथा सवांद श्रीकांत सराफ, हेमंत पाटील यांनी लिहिले आहे.
हा चित्रपट भारत सासणे ह्यांच्या " डफ" कथेवर आधारित आहे. या चित्रपटाचे या आधी ' पुणे फिल्म इंटरनॅशनल 'मध्ये निवड झालेली आहे.
हेही वाचा - कोरोनाच्या प्रलयामुळे बॉलिवूड हादरले, दिग्गज सेलेब्रिटींनी अनुभवला जीवघेणा अनुभव