ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी' जगभरात 'या' दिवशी होणार प्रदर्शित - release globally 9th may

Kalki 2898 AD : अभिनेता प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आता उन्हाळ्यात प्रदर्शित होणार असल्याचं बोललं जात आहे.

Kalki 2898 AD
कल्की 2898 एडी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 9, 2024, 4:46 PM IST

मुंबई - Kalki 2898 AD : 'सालार' या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर आग लावणारा बाहुबली स्टार प्रभास आणखी एका चित्रपटात झळकत असल्याचं सर्वांना माहित आहे. त्याचा आगामी 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. प्रभाससोबत हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी आणि साऊथ सुपरस्टार कमल हसन देखील या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कमल हसन या चित्रपटामध्ये खलनायकच्या भूमिकेत दिसेल, असं म्हटलं जात आहे. 'कल्की 2898 एडी'ची रिलीज डेट 12 जानेवारी होती, मात्र आता हा चित्रपट 9 मे 2024 रोजी रिलीज होणार असल्याचं बोललं जात आहे.

'कल्की 2898 एडी' ची रिलीज तारीख : 'कल्की 2898 एडी' रिलीजची अधिकृत माहीती सध्या देण्यात आलेली नाही. प्रभासचे चाहते 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु चित्रपटाची डेट पुढे ढकलण्यात आली असल्याचं जाणून घेतल्यानंतर अनेकांना धक्का बसू शकतो. 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाचे निर्माते प्रदर्शनाच्या तारखेबाबत संभ्रम असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान सध्या सोशल मीडियावर 'कल्की 2898 एडी' चित्रपटाची नवीन रिलीज डेट व्हायरल होत आहे. 'कल्की 2898 एडी'च्या रिलीजची तारीख ही इंटरनेटवर दर्शविली जात नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केलं आहे. अचानक चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाल्याच्या बातमीनं चाहत्यांची चिंता वाढली आहे.

प्रभासचे आगामी चित्रपट : 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या चित्रपटाकडून प्रभासला खूप अपेक्षा आहेत. दरम्यान बॉक्स ऑफिसवर प्रभास स्टारर 'सालार' जोरदार कमाई करत आहे. या चित्रपटानं आतापर्यत जगभरात 650 कोटीचा व्यवसाय केला आहे. हा चित्रपट अनेकांना पसंत पडत आहे. 'सालार' चित्रपटात प्रभास अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. दरम्यान प्रभासच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'स्पिरिट', 'राजा डिलक्स', 'कन्नप्पा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर'चा ट्रेलर 'या' तारखेला होणार प्रदर्शित
  2. आमिर खानचा जावई नुपूर शिखरेनं केला लुंगी डान्स, पाहा व्हिडिओ
  3. फार्महाऊसवर घुसखोरीनंतर विमानतळावर कडक बंदोबस्तात दिसला सलमान खान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.