ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी' चित्रपटाचे दिग्दर्शक नाग अश्विन आयआयटी बॉम्बे टेकफेस्टसाठी सज्ज - प्रभास स्टारर सायन्स

Kalki 2898 AD team at IIT Bombay : 'कल्की 2898 एडी'चे निर्माते गुरुवारी आयआयटी बॉम्बे येथील प्रतिष्ठित टेकफेस्टला उपस्थित राहण्यासाठी सज्ज झाले आहेत. विज्ञान आणि कलेच्याबद्दल बोलण्यासाठी चित्रपटाची टीम कार्यक्रमात उपस्थित राहून संवाद साधणार आहे.

Kalki 2898 AD
कल्की 2898 एडी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 5:00 PM IST

मुंबई - Kalki 2898 AD team at IIT Bombay : प्रभास स्टारर सायन्स फिक्शन 'कल्की 2898 एडी' चित्रपटाची टीम शुक्रवारी आयआयटी बॉम्बे दीक्षांत सभागृहातील टेकफेस्टला हजर राहणार आहे. दिग्दर्शक नाग अश्विन आणि वैजयंती मूव्हीज या प्रोडक्शन बॅनरच्या इतर सर्वजणांसह ही टीम या प्रतिष्ठित टेकफेस्टला उपस्थित असेल. यावेळी उपस्थित लोक नाग अश्विनसोबत संवाद साधतील आणि या चित्रपटाच्या कथानकासह वापरण्यात आलेल्या तंत्रज्ञानावरही चर्चा करतील. हा चित्रपट भारतातील सर्वात मोठ्या स्टार्ससह बनवलेला तांत्रिकदृष्ट्या प्रगत सिनेमॅटिक चित्रपट आहे.

निर्मात्यांनुसार हा चित्रपट भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बरोबरीने आणून तंत्रज्ञान आणि चित्रपट यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटाने यापूर्वी कॉमिक-कॉन येथे त्याचे शीर्षक लॉन्च केल्याने वादळ निर्माण झाले होते. आता, आशियातील सर्वात मोठ्या विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सवात कल्कीसोबत चित्रपट निर्मितीच्या प्रमुख पैलूंचे लॉन्च करण्यासाठी चित्रपटाची टीम तयार आहे.

लोकांच्या उपस्थितीत दिग्दर्शक नाग अश्विन आणि वैजयंती मूव्हीजचे प्रतिनिधी या तंत्रज्ञानावर आधारित कार्यक्रमाला सिनेमॅटिक उत्कृष्टतेचा टच देतील. उपस्थित राहणाऱ्यांना राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक नाग अश्विन यांच्याशी बोलण्याची संधी मिळेल. या चित्रपटात प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण आणि इतर सेलिब्रेटींची मोठी फळी आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर जगभर त्याला उदंड प्रतिसाद मिळाला होता. 14 जानेवारी रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. प्रभास स्टारर 'सालार' चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशाच्या पार्श्वभूमीवर त्याचा हा दुसरा चित्रपट प्रेक्षकैांच्या भेटीस येमार आहे. 2023 वर्षाचा निरोप दोताना चाहते त्याला सालारसाठी रांगा लावत आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाही ते त्याच्या 'कल्की 2898 एडी' पाहण्यासाठी रांग लावताना दिसू शकतील.

चित्रपट रसिक आणि तंत्रज्ञानप्रेमी दोघांसाठी ही शिकण्याची उत्तम संधी आहे. चित्रपटातील तंत्रज्ञानाचा कल्पक वापर पाहता नाग अश्विनला कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. 'कल्की 2898' च्यारिलीजचे काउंट डाऊन जसजशे सुरू झालंय तसतसा उत्साह वाढत आहे. एक गेम-चेंजर वाटणारी सिनेमॅटिक मास्टरपीस चाहत्यांना आणि समीक्षकांनाही खिळवून ठेवेल असा विश्वास टीमला वाटतो आहे.

हेही वाचा -

  1. 'हे नुकसान कधीही भरून न येणारं': रजनीकांत यांनी डीएमडीके प्रमुख विजयकांत यांना वाहिली अखेरची श्रद्धांजली
  2. अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली मजेशीर पोस्ट
  3. आयरा खान नुपूर शिखरे यांच्या लग्नानंतर होणार दोन रिसेप्शन्स? जाणून घ्या तारखा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.