ETV Bharat / entertainment

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण'च्या 8व्या सीझनमध्ये झळकणार काजोल आणि राणी मुखर्जी... - काजोल

Koffee With Karan 8 : 'कॉफी विथ करण'च्या 8व्या सीझनमध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत. पहिल्या एपिसोडमध्ये रणवीर-दीपिका येणार असल्याची खात्री झाल्यानंतर, आता या शोमध्ये राणी मुखर्जी आणि काजोलही दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Koffee With Karan 8
कॉफी विथ करण 8
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 24, 2023, 5:09 PM IST

मुंबई - Koffee With Karan 8 : करण जोहरचा आगामी टॉक शो 'कॉफी विथ करण'चा 8 वा सीझन हा सध्या खूप चर्चेत आहे. हा शो प्रसारित होण्याची वाट चाहते खूप आतुरतेनं पाहत आहेत. अलीकडेच या शोच्या निर्मात्यांनी एक बीटीएस (BTS) व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. आता करण जोहरनं चॅट शो 'कॉफी विथ करण 8' एपिसोडचा प्रोमो रिलीज केला. या प्रोमोमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग दिसत आहे. या प्रोमोमुळं सध्या इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर या जोडप्यामधील केमिस्ट्री पाहून चाहत्यांची उत्कंठा वाढवली आहे.

काजोल आणि राणी मुखर्जी दिसणार एकत्र : 'कॉफी विथ करण 8' या शोमध्ये दीपिका आणि रणवीर पाहुणे म्हणून निश्चित झाल्यानंतर आता चाहते शोच्या उर्वरित पाहुण्यांची यादी जाहीर होण्याची वाट पाहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या शोमध्ये अभिनेत्री काजोल ही तिच्या चुलत बहीण राणी मुखर्जीसोबत येणार आहे. या बहिणीं ची जोडी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमात आणि अवार्ड शोमध्ये पाहायला मिळते.

करणच्या शोमध्ये राणी-काजोलची जोडी पाहायला मिळेल : मिळालेल्या माहितीनुसार राणी मुखर्जी आणि काजोल करण जोहरच्या 'कॉफी विथ करण सीजन 8' या शोमध्ये 16 वर्षांनंतर एकत्र दिसणार आहेत. ही जोडी 2007 मध्ये शोमध्ये शेवटी शाहरुख खानसोबत दिसली होती. एका रिपोर्टनुसार 'काजोल आणि राणी मुखर्जी एकत्र एपिसोड शूट करण्यासाठी सज्ज आहे. करणनं या दोघांसाठी अनेक मजेदार गोष्टींची योजना आखल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख-सुहाना, करीना कपूर खान,आलिया भट्ट, रोहित शेट्टी अजय देवगण, सनी देओल आणि बॉबी देओल हे कलाकार या शोमध्ये दिसणार आहेत. 'कॉफी विथ करण 8' डिस्ने प्लस हॉटस्टारवर 26 ऑक्टोबरपासून प्रसारित होणार आहे. सध्या करण या शोचे जोरदार प्रमोशन करत आहे.

हेही वाचा :

  1. Happy Birthday Prabhas : क्रिती सेनॉन वाढदिवसानिमित्त दिल्या प्रभासला शुभेच्छा; केली खास पोस्ट शेअर...
  2. Kangana perform Ravan Dahan : कंगना रणौतच्या हस्ते होणारे दिल्लीतील रावण दहन, लव कुश रामलीला समितीचा ऐतिसाहासिक निर्णय
  3. Leo Box Office Collection Day 6: थलापथी विजय स्टारर 'लिओ'नं बॉक्स ऑफिसवर मारली बाजी; रिलीजच्या सहाव्या दिवशी करेल इतकी कमाई...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.