ETV Bharat / entertainment

Jawan day 1 advance booking: शाहरुख खान स्टारर 'जवान'ने अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये केली इतकी कमाई ; जाणून घ्या....

Jawan day 1 advance booking: शाहरुख खानच्या 'जवान'ने 24 तासांत अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड तोडण्यास सुरुवात केली आहे. रिलीजपपूर्वीच या चित्रपटाने 10 कोटीची कमाई केली आहे. 'जवान'ने देशांतर्गत अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'पठाण'ला मागे टाकले. दरम्यान आता 'जवान' चित्रपट 'बाहुबली 2'चे प्री-बुकिंग रेकॉर्डला मागे टाकण्यासाठी सज्ज झाला आहे.

Jawan day 1 advance booking
जवान दिवस 1 अ‍ॅडव्हान्स बुकिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 4:18 PM IST

मुंबई - Jawan day 1 advance booking: शाहरुख खानचा 'पठाण' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट झाला होता. आता पुन्हा एकदा शाहरुखचा आगामी चित्रपट 'जवान' हा बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. अ‍ॅटली कुमार दिग्दर्शित, 'जवान' हा बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. शाहरुख खान यावेळी पुन्हा एकदा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटाद्वारे पडद्यावर आग लावण्यासाठी येत आहे. दरम्यान आता 'जवान' चित्रपटाच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगचे आकडे चकित करण्यासारखे समोर आले आहेत. 'जवान'च्या पहिल्या दिवशीच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगने हे सिद्ध केले आहे की, या चित्रपटाने चाहत्यांना किती वेड लावले आहे. या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग ही 1 सप्टेंबरला सुरू झाली. 'जवान'ची अ‍ॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच चित्रपटाची तिकिटे खूप वेगाने विकली गेली.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

अ‍ॅडव्हान्स बुकिंग : सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या 24 तासांत सर्वाधिक प्री-सेल्सची नोंद केली आहे. शाहरुख खान स्टारर 'जवान'ने आगाऊ बुकिंगमध्येही धुमाकूळ घातला आहे. 'जवान'ने सुमारे 24 तासात 305 हजार तिकिटांच्या विक्रीसह 10.10 कोटीचा टप्पा ओलांडला आहे. पीव्हीआर (PVR), आयनोक्स (INOX) आणि सिनेपोलिस ( Cinepolis)मध्ये सुमारे 165,000 तिकिटे विकली आहेत, जो पहिल्या 24 तासामधीला रेकॉर्ड आहे. यासह 'जवान'ने पीआयसीमधील 117 हजार तिकिटांमध्ये 'पठाण'चा रेकॉर्डही तोडला आहे. आगाऊ बुकिंगमध्ये 'जवान' अशी गती चालू राहिला तर, हा चित्रपट 'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडू शकतो.

'जवान' या तारखेला होणार रिलीज : 'जवान'चे अ‍ॅडव्हान्स बुकिंग हिंदीतील आतापर्यंतचे सर्वाधिक अ‍ॅडव्हान्स बुकिंग ठरेल. एसएस राजामौली यांच्या 'बाहुबली 2'ने पहिल्या दिवशी 650,000 तिकीटांसह पीआयसीमध्ये सर्वाधिक तिकिटे विकण्याचा विक्रम केला होता. आता 'जवान' हा विक्रम मोडेल असे दिसत आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख खान 'जवान'मध्ये दुहेरी भूमिकेत झळकणार आहे. 'जवान'ची निर्मिती रेड चिलीज एंटरटेनमेंटने केली आहे. शाहरुख खान व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी आणि सान्या मल्होत्रा हे देखील कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण आणि संजय दत्त खास कॅमिओमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबरला हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

  1. Kushi box office collection day 1: सामंथा रुथ प्रभू आणि विजय देवरकोंडा यांच्या 'खुशी' चित्रपटाने पहिल्याच दिवशी केली प्रचंड कमाई...
  2. Dream Girl 2 BO Collection Day 9 : 'ड्रीम गर्ल 2' बॉक्स ऑफिसवर करत आहे जबरदस्त कमाई...
  3. Rajinikanths Jailer will arrive on OTT : बॉक्स ऑफिसवरील उदंड यशानंतर रजनीकांतच्या 'जेलर'चे ओटीटीवर आगमन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.