ETV Bharat / entertainment

Jawan box office collection day 19 : शाहरुख खानचा 'जवान' लवकरच जागतिक स्तरावर 1000 कोटींचा टप्पा ओलांडेल... - बॉक्स ऑफिस

Jawan Box Office Collection Day 19 : शाहरुख खानचा 'जवान' चित्रपट लवकरच जागतिक स्तरावर 1000 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. या चित्रपटाचा क्रेझ हा प्रचंड दिसून येत आहे. हा चित्रपट रिलीजच्या पाहण्यासाठी तिसऱ्या आठवड्यातही अनेकजण चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत आहे.

Jawan box office collection day 19
जवान बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १९
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 25, 2023, 12:58 PM IST

मुंबई - Jawan Box Office Collection Day 19 : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान सध्या 'जवान'च्या यशाचा आनंद घेत असून गणेश उत्सवानिमित्त बाप्पांचे आशीर्वाद घेत आहे. बॉक्स ऑफिसवर 'जवान' चित्रपटाची कमाई 19व्या दिवशीही उत्तम होताना दिसतेय. तिसऱ्या रविवारीही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त व्यवसाय केला. हा चित्रपट लवकरच जगभरात 1000 कोटींचा टप्पा पार करणार आहे. 'जवान'नं खूप झपाट्यानं बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. 19व्या दिवशी 'जवान' बॉक्स ऑफिसवर किती कमाई करू शकतो हे जाणून घेऊया...

जवानचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन : शाहरुख खान स्टारर 'जवान'नं बॉक्स ऑफिसवर चांगली सुरुवात केली होती. जन्माष्टमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं पहिल्याच दिवशी 75 कोटींचा व्यवसाय केला होता. त्यानंतर 'जवान'नं पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 389.88 कोटीची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटानं 136.1 कोटीचा व्यवसाय केला. रविवारी म्हणजेच रिलीजच्या 18व्या दिवशी या चित्रपटानं 14.74 कोटीचा व्यवसाय केला. यासह या चित्रपटाचं एकूण कलेक्शन 560.83 कोटी झाले आहे. 'जवान' रिलीजच्या 19व्या दिवशी 5.50 कोटीची कमाई करू शकतो. यासह या चित्रपटाचं एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 566.07 कोटी होईल.

जवानची स्टारकास्ट : शाहरुख खानचा 'जवान' हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. यामध्ये हिंदी आणि साऊथ स्टार्सनी चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. 'जवान'मध्ये शाहरुख खाननं दुहेरी भूमिका साकारली आहे. तसेच साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटामध्ये नयनतारा ही अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसली आहे. यासोबतच दीपिका पदुकोण या चित्रपटात कॅमिओ करताना दिसलीय. 'जवान'मध्ये सान्या मल्होत्रा, रिद्धी डोगरा, प्रियामणी, सुनील ग्रोवर, एजाज खान आणि इतर काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. साऊथ स्टार विजय सेतुपतीनं खलनायकाच्या भूमिकेत चाहत्यांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अ‍ॅटली कुमार यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. Parineeti and Raghav look perfect : परफेक्ट पती पत्नी परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढाचे लग्नानंतरचे आकर्षक फोटो
  2. Vicky and Katrina movie together : 'कतरिनासोबत काम करायला आवडेल पण..' विकी कौशलचा खुलासा
  3. Raghav Parineeti Wedding: परिणीती चोप्रा, राघव चड्ढा विवाहबद्ध! जाणून घ्या, त्यांचा आजचा रोमँटिक प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.