मुंबई : 'सुपरस्टार' रजनीकांतचा 'जेलर' चित्रपट रूपेरी पडद्यावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाची क्रेझ खूप वाढत आहे. चित्रपट पाहण्यासाठी चाहते चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी करत आहेत. 'जेलर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. हा चित्रपट ११ ऑगस्ट रूपेरी पडद्यावर रिलीज झाला आणि दोन दिवसांतच अफाट कमाई केली. तमिळनाडूमध्ये चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने देशांतर्गत ७५ कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. शनिवारी आणि रविवारी ही कमाई वाढण्याची शक्यता आहे. 'थलैयवा'चा हा चित्रपट रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल असे सध्या दिसत आहे.
'जेलर' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धमाल : २०० कोटी रुपयांच्या बजेटच्या या अॅक्शन कॉमेडी चित्रपटाने पहिल्या दिवशी भारतात ४८.३५ कोटी रुपयांची कमाई केली. दरम्यान, इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या मते या चित्रपटाने २ दिवसात सर्व भाषांसह २७ कोटींहून अधिकचा व्यवसाय बॉक्स ऑफिसवर केला, यासह या चित्रपटाची एकूण कमाई ७५.३५ कोटींवर पोहोचली आहे. दुसऱ्या दिवशी, तामिळनाडूमध्ये 'जेलर' चित्रपटाचा एकूण ६९.१२% व्यवसाय होता. हा चित्रपट ३ दिवसात १०० कोटीचा टप्पा पार करू शकतो असे सध्या दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">
'जेलर'चा बॉक्स ऑफिसवर मुकाबला : रूपेरी पडद्यावर सध्या 'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' दाखल झाले आहे, मात्र तरीही 'जेलर' चित्रपट रूपेरी पडद्यावर आपला जलवा दाखवत आहे. 'सन पिक्चर्स'द्वारे बँकरोल केलेला हा चित्रपट तामिळनाडूमधील ८०० स्क्रीनसह जगभरातील ४००० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. 'जेलर' मध्ये रजनीकांत व्यतिरिक्त मिर्ना मेनन, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार, मोहनलाल, जॅकी श्रॉफ आणि वसंत रवी महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटातील गाणी सध्या खूप चर्चेत आहे.
हेही वाचा :