ETV Bharat / entertainment

Irfan Khan birth anniversary : क्रिकेटर बनण्याची इच्छा असलेला इरफान बनला अष्टपैलू कलाकार - इरफानने दमदार भूमिका साकारल्या

बॉलिवूडचा हरहुन्नरी, अष्टपैलू प्रतिभावंत अभिनेता इरफान खानचा आज जन्मदिन आहे. आपल्या अभिनयाची अमिट छाप सोडून तो निघून गेला आहे. आज प्रत्येक चाहत्याला त्याची आठवण सतावत राहिल. त्याच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्याच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Jan 7, 2023, 10:54 AM IST

Updated : Jan 9, 2023, 2:25 PM IST

मुंबई - बॉलिवूडमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण करणं कठीण मानलं जातं. या ग्लॅमरस जगात एखाद्या गॉडफादरचा हात पाठीशी असला तर, सहज एन्ट्री मिळवता येते. मात्र, कोणत्याही गॉडफादरशिवाय आपली ओळख निर्माण करणारे बरेच कलाकार आज यशस्वी ठरले आहेत. यामध्ये अभिनेता इरफान खान याचाही समावेश आहे. फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने सिनेसृष्टीवर छाप सोडली आहे. कॅन्सरसारख्या आजारालाही मात देत तो पुन्हा एकदा पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला पण एका क्षणी तो आपल्यातून निघूनही गेला.

अभिनेता इरफान खान
अभिनेता इरफान खान

इरफान खानचे नाव इरफान यासिन खान असे आहे. त्याचा जन्म ७ जानेवारी १९६७ साली जयपूर येथे झाला होता. फार कमी लोकांना माहिती असेल, की इरफानला अभिनेता नाही तर क्रिकेटर बनण्याची इच्छा होती. मात्र, त्याचं नशीब त्याला मुंबईत घेऊन आलं. त्याच्या कुटुंबीयाचा अभिनय क्षेत्रात करिअर करण्याला विरोध होता. मात्र, त्याला नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्याच्या फिल्मी करिअरला सुरुवात झाली.

अभिनेता इरफान खान
अभिनेता इरफान खान

इरफानसाठी सुरुवातीचा काळ फार संघर्षमय होता. तो छोटीमोठी काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. एसी दुरुस्त करण्याचेही कामही तो करत असे. पुढे टीव्हीवरील 'बनेगी अपनी बात' या मालिकेद्वारे त्याला ब्रेक मिळाला. 'श्रीकांत', 'स्टार बेस्टसेलर्स', यांसारख्या मालिकेतूनही त्याच्या अभिनयाची चुणूक त्याने दाखवून दिली. मोठ्या पडद्यावर त्याचा पदार्पणीय चित्रपट ठरला तो म्हणजे १९८८ साली प्रदर्शित झालेला सलाम 'बॉम्बे'. या चित्रपटाला ऑस्करचे नामांकनही मिळाले होते. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे समीक्षकांनीही कौतुक केले होते.

अभिनेता इरफान खान
अभिनेता इरफान खान

त्याचे बरेचसे चित्रपट अयशस्वी देखील ठरले. मात्र, लंडनच्या एका दिग्दर्शकाने इरफानला पुन्हा संधी देत 'द वॉरिअर' या चित्रपटात मुख्य भूमिका दिली. या चत्रपटाचे हिमाचल प्रदेश आणि राजस्थान येथील ११ ठिकाणी शूटिंग झाले होते. २००१ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही या चित्रपटाची स्क्रिनींग झाली होती. २००५ साली प्रदर्शित झालेल्या 'रोग' चित्रपटातील भूमिकेनेही इरफानला ओळख निर्माण करून दिली. चित्रपट समीक्षकांकडून इरफानच्या डोळ्यातून त्याचा अभिनय जास्त व्यक्त होतो, अशी प्रशंसा देखील झाली होती.

इरफान खानला न्युरोएन्डोक्राईन कॅन्सरचे निदान झाले होते. मात्र, कॅन्सरवर यशस्वी मात करून तो मायदेशी परतला होता. त्यानंतर त्याने अर्धवट राहिलेला 'अग्रेजी मीडियम' चित्रपट पूर्ण केला आणि २९ एप्रिल २०२० मध्ये मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ५३ व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला होता.

अभिनेता इरफान खान
अभिनेता इरफान खान

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी त्याने 'अंग्रेजी मीडियम' हा चित्रपट स्वीकारला होता. याचे काही शूटींगही पार पडले होते. हा चित्रपट पूर्ण होणार की नाही अशी शंका व्यक्त केली जात असतानाच त्यांनी आजारातून उठल्यानंतर कंबर कसली आणि लंडनमध्ये पुढील शूटींगला सुरूवात केली. त्यानंतरच ते मायदेशी परतले होते. ठरल्या प्रमाणे 'अंग्रेजी मीडियम' थिएटरमध्ये रिलीज झाला. दरम्यान कोरोना व्हायरसाचा संक्रमणाचा काळ सुरू झाला होता. त्यामुळे भारतात लॉकडाऊन करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. त्यामुळे थिएटरमध्ये लागलेला अंग्रेजी मीडियम लोकांना पाहताच आला नाही. अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता.

इरफानच्या निधनाच्या एक आठवडा अगोदर त्यांना मातृशोक झाला होता. त्यांची आई सईदा बेगम यांचं निधन झालं होतं. मात्र लॉकडाऊन मुळे इरफान आईच्या अंत्यविधीला उपस्थित राहू शकले नव्हते. हे शल्य त्याच्या मनात कायम राहिले. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे आपल्या आईच अंत्यदर्शन घेतलं होतं.

अभिनेता इरफान खान
अभिनेता इरफान खान

त्यांनी अनेक नाटकांसोबतच हिंदी, इंग्रजी सिनेमाधूनही अभिनय केला. ए माइटी हार्ट, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेजिंग स्पाइडर मॅन या हॉलिवूड चित्रपटात ते झळकले.इरफान खानइरफान खानसुमारे ७० चित्रपटातून त्यांनी अभिनय केला. 'लाइफ इन अ मेट्रो', 'पानसिंग तोमर', 'द लंचबॉक्स', 'हैदर', 'गुंडे', 'पिकू', 'तलवार', 'हिंदी मीडियम' यांसारख्या चित्रपटांमध्ये इरफानने दमदार भूमिका साकारल्या होत्या. अंग्रेजी मीडियम हा चित्रपट त्यांच्या अखेरचा चित्रपट ठरला.

अभिनेता इरफान खान
अभिनेता इरफान खान

इरफान खान यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २००८ मध्ये 'लाइफ इन अ... मेट्रो' या चित्रपटासाठी त्यांची निवड फिल्मफेअर पुरस्कारासाठी झाली होती. २००४ मध्ये त्यांनी 'हासिल' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कारही मिळवला होता. २०११ मध्ये त्यांना भारत सरकारने 'पद्मश्री' पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

Last Updated : Jan 9, 2023, 2:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.