मुंबई - 13th Indian Music Festival 2023 : 'नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स’ (एनसीपीए) आणि ‘सिटी इंडिया’ या दोन संस्था एकत्र येऊन 13व्या भारतीय संगीत महोत्सव आयोजित करत आहेत. 'सिटी एनसीपीए आदि अनंत: फ्रॉम हिअर टू इटर्निटी' या महोत्सवाअंतर्गत 5 दर्जेदार कार्यक्रमाचं आयोजन मुंबई आणि दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे. यावर्षीच्या भारतीय संगीत महोत्सवात 4 वेगवेगळ्या पिढींमधील कलाकार एकत्र येऊन आपल्यासमोर शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, लोक संगीत आणि असे अनेक संगीत कलाप्रकार सादर करणार आहेत.
भारतीय संगीत महोत्सव : या कार्यक्रमाच्या प्रोग्रामिंग हेड डॉ. सुवर्ण राव यांनी सांगितलं की, ''प्रेक्षकांना आपल्या देशाच्या संगीत परंपरेची श्रीमंती आणि शिस्तबद्ध गुरु-शिष्य परंपरेचा अनुभव करून देणं हा महोत्सवाचा हेतू आहे''. या अविस्मरणीय कार्यक्रमाचा शुभारंभ 9 डिसेंबर 2023 रोजी मुंबईतील एनसीपीए येथे होत आहे. नवी दिल्ली येथे 28 जानेवारी 2024 रोजीपर्यंत हा महोत्सव 5 कलाविष्कारांमध्ये सादर होणार आहे. या संगीत महोत्सवामध्ये पहिलं सादरीकरण हे झाकीर हुसैन, साबिर खान आणि देबोप्रिया चॅटर्जी यांच्या मैफिलीनं होईल.
हे कलाकार करणार सादरीकरण : दुसरी मैफिल ही कौशिकी चक्रवर्ती या सादर करणार आहे. त्याचं हे सादरीकरण भारतीय संगीत क्षेत्रातील दिग्गज गौहर जान, बेगम अख्तर, एम.एस. सुब्बुलक्ष्मी, शोभा गुर्टू, नूर जहाँ आणि किशोरी आमोणकर यांना एक मानवंदना असेल. याशिवाय या कार्यक्रमात तिसरं सादरीकरण होईल. या सादरीकरणात गुरुदेव टागोरांच्या बालकविता, गुलजार, शांतनू मोइत्रा, शान, रेखा भारद्वाज, महालक्ष्मी अय्यर आणि काही बालकलाकार परफॉर्म करेल. यानंतर दिल्लीत लोककलेचं एक अद्भुत सादरीकरण मामे खान आणि 47 राजस्थानी लोक कलाकार करणार आहेत. या महोत्सवाचं शेवटचं सादरीकरण झाकीर हुसैन करेल. त्यांच्या सोबतीला कला रामनाथ आणि जयंती कुमारेश हे आपल्या संगीताची जादू, तबला, व्हायोलिन आणि वीणा या वाद्यांद्वारे दाखवतील.
प्राचीन संगीताची सेवा : आदि अनंत या संगीत महोत्सवाच्या माध्यामतून एनसीपीए आपल्या देशाची प्राचीन संगीत संस्कृती, परंपरा ही जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आमच्या या प्रयत्नातून आदि अनंतसारखे अनेक कार्यक्रम होत राहावे. त्यामधून भारतीय संगीताची सेवा आणि प्रबोधन असचं सुरू राहील. कला आणि संस्कृती हे आपल्या समाजाचे दोन महत्त्वाचे खांब आहेत. आमच्या या संगमातून भारतीय संगीत जगभरात कसं बहरत राहील याचा प्रयत्न आम्ही करत राहू, अशी प्रतिक्रिया डॉक्टर सुवर्णा राव यांनी दिली आहे.
हेही वाचा :