हैदराबाद - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी आगामी २०२३ च्या विश्वचषकाचे 'गोल्डन तिकीट' सुपरस्टार रजनीकांत यांना दिलंय. येत्या ५ ऑक्टोबर पासून भारतात विष्वचषकाच्या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना इंग्लंड विरुद्ध न्यूझिलंड संघादरम्यान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. अंतिम सामनाही याच मैदानावर १९ नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.
-
Honoured to present the golden ticket to the unparalleled cinematic icon, Shri @rajinikanth! His charisma knows no bounds and his passion for cricket is well-known. Delighted to welcome Thalaiva as our distinguished guest at the @ICC @CricketWorldCup 2023! Let the magic begin!… https://t.co/ku4EBrFAjE
— Jay Shah (@JayShah) September 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Honoured to present the golden ticket to the unparalleled cinematic icon, Shri @rajinikanth! His charisma knows no bounds and his passion for cricket is well-known. Delighted to welcome Thalaiva as our distinguished guest at the @ICC @CricketWorldCup 2023! Let the magic begin!… https://t.co/ku4EBrFAjE
— Jay Shah (@JayShah) September 19, 2023Honoured to present the golden ticket to the unparalleled cinematic icon, Shri @rajinikanth! His charisma knows no bounds and his passion for cricket is well-known. Delighted to welcome Thalaiva as our distinguished guest at the @ICC @CricketWorldCup 2023! Let the magic begin!… https://t.co/ku4EBrFAjE
— Jay Shah (@JayShah) September 19, 2023
सुपरस्टार रजनीकांतच्या आधी बीसीसीआयने मेगास्टार अमिताभ बच्चन आणि क्रिकेट दिग्गज भारतरत्न सचिन तेंडुलकर यांना गोल्डन तिकीट दिलं होतं. रजनीकांत उर्फ थलैवा यांना खास व्हीआयपी स्टँडवरून सर्व सामने विनामूल्य पाहता येणार आहेत. त्याची उपस्थित प्रेक्षकांसाठी खूप उत्साहवर्धक असेल हे वेगळं सांगायला नको.
-
The Phenomenon Beyond Cinema! 🎬
— BCCI (@BCCI) September 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The BCCI Honorary Secretary @JayShah presented the golden ticket to Shri @rajinikanth, the true embodiment of charisma and cinematic brilliance. The legendary actor has left an indelible mark on the hearts of millions, transcending language and… pic.twitter.com/IgOSTJTcHR
">The Phenomenon Beyond Cinema! 🎬
— BCCI (@BCCI) September 19, 2023
The BCCI Honorary Secretary @JayShah presented the golden ticket to Shri @rajinikanth, the true embodiment of charisma and cinematic brilliance. The legendary actor has left an indelible mark on the hearts of millions, transcending language and… pic.twitter.com/IgOSTJTcHRThe Phenomenon Beyond Cinema! 🎬
— BCCI (@BCCI) September 19, 2023
The BCCI Honorary Secretary @JayShah presented the golden ticket to Shri @rajinikanth, the true embodiment of charisma and cinematic brilliance. The legendary actor has left an indelible mark on the hearts of millions, transcending language and… pic.twitter.com/IgOSTJTcHR
आयसीसी विश्वचषक २०२३ साठी रजनीकांतला गोल्डन तिकीट बहाल केल्याचा फोटो बीसीसीआयनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मंगळवारी हे तिकीट रजनीकंत यांच्याकडं सुपूर्त केलं. रजनीकांतनी सामन्यांना हजेरी लावल्यामुळे त्याच्या उपस्थितीचा आम्हाला आनंद वाटेल असे फोटोसह लिहिण्यात आलंय.
गुजरातमधील अहमदाबाद येथे नव्यानं बांधण्यात आलेलं नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठं क्रिकेट मैदान आहे. या स्टेडियमवर पहिल्यांदाच विश्वचषकाचा सामना खेळवला जाणारेय. पूर्वी सरदार पटेल स्टेडियम असं नाव असलेलं हे मैदान नुतणीकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने नामकरण करण्यात आलंय. सुमारे ८०० कोटी रुपये खर्च करुन या मैदानाची निर्मिती करण्यात आलीय. १ लाख १० हजार बैठक क्षमता असलेलं हे भव्य मैदान आता विश्वचषकाच्या उद्घाटनसाठी सज्ज झालं असून इतर सामन्यांसह याच मैदानावर यंदाच्या विश्वचषकाचा अंतिम सामनाही पार पडेल.
कामाच्या आघाडीवर रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट अलिकडे रिलीज झाला होता. या चित्रपटाचा अफाट प्रतिसाद मिळाला. त्यानं जय भीम फेम दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल दिग्दर्शित आगामी चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू केले आहे. त्याच्याकडे विक्रम या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक लोकेश कनागराजसोबत एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट देखील आहे.
हेही वाचा -
२. Ganesh Festival Celebration Of Celebrities: पाहा 'या' सेलिब्रेटींच्या घरी झालंय गणपती बाप्पाचं आगमन