ETV Bharat / entertainment

Cannes 2022 : ग्लॅमरस शिष्टमंडळासह कान्स २०२२ मध्ये रेड कार्पेटवर अवतरले केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर - 75 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल

75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ( 75 th Cannes Film Festival ) उद्घाटन समारंभाला मंगळवारी सुरुवात झाली आहे. यासाठी भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ( I & B Minister Anurag Thakur ) यांनी पॅलेस डेस फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर तारांकित भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

75 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल
75 वा कान्स फिल्म फेस्टिव्हल
author img

By

Published : May 18, 2022, 12:06 PM IST

कान्स, फ्रान्स - 75 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या ( 75 th Cannes Film Festival ) उद्घाटन समारंभाला मंगळवारी सुरुवात झाली आहे. यासाठी भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ( I & B Minister Anurag Thakur ) यांनी पॅलेस डेस फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवर तारांकित भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. केंद्रीय मंत्र्यासह ग्लॅमरस रेड कार्पेटवर उतलेल्या टीममध्ये आर माधवन, रिकी केज, वाणी त्रिपाठी, प्रसून जोशी, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि शेखर कपूर यांचा समावेश होता.

"भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण. कान्स फिल्म फेस्टीव्हलमधील पहिला 'कंट्री ऑफ ऑनर' जागतिक चित्रपट निर्मात्यांसाठी 'जगातील कंटेंट हब आणि पसंतीचे 'पोस्ट प्रोडक्शन हब' मध्ये प्रकट होण्यासाठी सज्ज झाला आहे.", असे अनुराग यांनी लिहिले आहे. मंत्री ठाकूरने यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

कान्स फेस्टीव्हलच्या रेड कार्पेटवर उतरण्यासाठी माधवन आणि नवाजुद्दीन यांनी ब्लॅक टक्सिडोची निवड केली, तर रिकी, प्रसून आणि अनुराग अनुक्रमे निळ्या, काळ्या आणि क्रीम रंगांच्या बंधगळा सूटमध्ये दिसले. वाणीने निळ्या रंगाची सुंदर साडी नेसली होती आणि शेखरने नेहरू जॅकेटसह पांढरा कुर्ता घातला होता. याशिवाय नयनतारा, पूजा हेगडे, तमन्ना भाटिया आणि लोक गायिका मामे खान हे कलाकारही माहिती आणि प्रसारण मंत्री यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाचा एक भाग आहेत. अभिनेता अक्षय कुमार देखील अधिकृत शिष्टमंडळाचा भाग होता परंतु त्याने कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्याची निवड रद्द करावी लागली.

यापूर्वी, बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण जी सध्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये ज्युरी सदस्य सामील झाली आहे. तिने रेड कार्पेट समारंभात सब्यसाचीने डिझाइन केलेली साडी परिधान केली होती. कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या 75 व्या आवृत्तीत, मार्की इव्हेंटचा व्यावसायिक भाग असलेल्या मार्चे डू फिल्ममध्ये भारताला 'कंट्री ऑफ ऑनर' म्हणून नाव देण्यात आले आहे.

हेही वाचा - कान्स 2022 मध्ये सब्यसाचीच्या पोशाखात अवतरली दीपिका पदुकोण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.