मुंबई - अभिनेता हृतिक रोशनने करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तो त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत पार्टीत पोहोचला होता. हातात हात घालून त्याने धडाकेबाज एन्ट्री केली. दोघांनी पार्टीच्या ठिकाणाबाहेर जमलेल्या हौशी फोटोग्राफर्ससाठी पोजही दिली. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये हृतिक सबा पाहुण्यांना त्यांची गोड ओळख करून देताना दिसत आहे.
या जोडप्याने काळे कपडे घालून एकमेकांची साथ दिली. सबा काळ्या रंगाच्या कट-आउट ड्रेसमध्ये दिसली, तर हृतिक काळ्या रंगाच्या सूटमध्ये सुंदर दिसत होता. या पार्टीत हृतिकची माजी पत्नी सुजैन खानही हजर होती. तिने तिचा कथित बॉयफ्रेंड अर्सलान गोनीसोबत पार्टीला हजेरी लावली होती.
फेब्रुवारीमध्ये जेव्हा ते एकत्र डिनर डेटवर दिसले तेव्हापासून हृतिक आणि सबा यांच्याबद्दल अफवा सुरू झाल्या. नंतर सबा देखील हृतिकच्या कुटुंबात गेट-टूगेदरसाठी सामील झाली होती.
दोघांनीही त्यांच्या रिलेशनबद्दल अधिकृत दुजोरा दिलेला नाही. पण सार्वजनिकरित्या ते ज्या प्रकारे वावरत आहेत त्यावरुन त्यांचे नाते स्पष्ट दिसत असते.
हेही वाचा - करण जोहरने ५० व्या वाढदिवसानिमित्य जाहीर केली ''रॉकी आणि रानी की प्रेम कहानी''ची रिलीज डेट