ETV Bharat / entertainment

युरोपमधील रोमँटिक सुट्टीवरुन सबा आझादसह मुंबईत परतला ह्रतिक रोशन - बॉलिवूड स्टार हृतिक रोशन

हृतिक रोशन आणि त्याची प्रेयसी सबा आझाद त्यांच्या लंडनमधील सुट्टीवरून भारतात परतले आहेत. काल रात्री हे जोडपे मुंबई विमानतळावर हातात हात घालून एंट्री करताना एकत्र दिसले.

हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद
हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझाद
author img

By

Published : Jul 25, 2022, 9:45 AM IST

मुंबई - बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद शनिवारी रात्री मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. हौशी फोटोग्राफर्सच्या समाधानासाठी त्यांनी फोटोसाठी पोझ दिल्या. हे लव्हबर्ड्स नेहमीपेक्षा जास्त लहज वावरताना दिसून आले.

गेल्या पंधरवड्यापासून सबा आझाद हृतिकसोबत त्यांच्या युरोपमधील रोमँटिक सुट्टीच्या आठवणी जमा करण्यात गुंतली होती. काल रात्री भारतात परतण्यापूर्वी या जोडप्याने व्हिंटेज कारमध्ये लाँग ड्राईव्ह केली, लंडनमध्ये काही जॅझ संगीताचा आनंद घेतला आणि काही चवीष्ठ अन्नाचा आस्वाद घेतला. विमानतळावर हे जोडपे पोहोचल्यानंतरचे त्यांचे व्हिडिओ काही काळातच व्हायरल झाले.

फेब्रुवारीमध्ये एकत्र डिनर डेटवर दिसल्यापासून हृतिक आणि सबाविषयीच्या अफवा सुरू झाल्या. नंतर सबा देखील हृतिकच्या कुटुंबात गेट-टूगेदरसाठी सामील झाली होती. निर्माता करण जोहरच्या 50 व्या वाढदिवसाच्या पार्टीत पहिल्यांदा एकत्र दिसल्यापासून हृतिक आणि सबा हे चर्चेत आले आहेत.

सबा एक बहु-प्रतिभावान अभिनेत्री आणि गायिका आहे. डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, शानदार आणि कारवां यासारख्या अनेक उल्लेखनीय बॉलिवूड चित्रपटांचा ती एक भाग होती. रॉकेट बॉईजमधील परवाना इराणीच्या भूमिकेसाठी तिचे खूप कौतुक झाले. ती पुढे लेखक-अभिनेता रुमाना मोल्ला दिग्दर्शित मिनीमम या फ्रेंच चित्रपटात दिसणार आहे.

दरम्यान चित्रपटाच्या आघाडीवर अभिनेता ह्रतिक रोशन आगामी 'विक्रम वेधा'च्या रिलीजची वाट पाहत आहे ज्यात सैफ अली खान आणि राधिका आपटे देखील आहेत. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय, तो बहुप्रतिक्षित 'क्रिश 4' सह सिद्धार्थ आनंदच्या 'फायटर'मध्ये दीपिका पदुकोणसोबत पहिल्यांदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा -Rajinikanth : अभिनेता रजनीकांतचा आयकर विभागाकडून गौरव.. तामिळनाडूत भरला सर्वाधिक कर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.