मुंबई - मराठमोळी अभिनेत्री पूजा भालेकरने सोशल मीडियावर एकामागून एक तिचे अनेक हॉट अँगल असलेले फोटो शेअर केले आहेत. तेलुगू चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या पूजाची राम गोपाल वर्मा यांनी ऑडिशन घेतली आणि तिला 'लडकी: एन्टर द गर्ल ड्रॅगन'मध्ये संधी दिली होती. लहानपाणापासून खेळाची आवड असलेल्या पूजाने आपली अभिनयाची आवड जपली. आकर्षक दिसण्यासोबतच तिने अभिनयाचे धडेही गिरवले. याचा लाभ तिला यश मिळवण्यात निश्चितपणे झाला. गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष केलेल्या पूजाला राम गोपाल वर्माने एखाद्या रत्नपारख्या प्रमाणे निवडले आणि रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी दिली. अर्थातच पूजा भालेकरनेही या संधीचे सोने केले.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अभिनेत्री पूजा भालेकरने इन्स्टाग्रामवर तिच्या मादक बिकिनीमधील बीचचे अनेक फोटो पोस्ट करून चाहते आणि फॉलोअर्समध्ये खळबळ उडवून दिली आहे. या फोटोंमध्ये पूजाची देसी आणि हॉट स्टाइल पाहायला मिळत आहे. यावर 9 हजारांहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत. पूजा ही बिनधास्त अभिनेत्री आहे. मराठी मुली लाजतात हा समज तिच्याकडे पाहून कुठचा कुठे पळून जातो. अतिशय आत्मविश्वासाने ती समजात जशी वावरते तशीच ती सिनेमाच्या कॅमेऱ्यासमोरही वावरते.
तसे पाहिले तर पूजा चित्रपट अभिनेत्री होण्याआधी एक कुशल खेळाडू, मॉडेल आणि सोशल मीडियावर प्रभाव टाकणारी म्हणून चर्चेत होती. यानंतर तिला अभिनय क्षेत्रातही यश मिळाले. पूजा भालेकरचा जन्म २५ सप्टेंबर १९९४ रोजी मुंबईत झाला होता. तसे पाहिले तर पूजाने लहानपणापासूनच मार्शल आर्टमध्ये करिअर करण्याचा विचार केला होता. यासोबतच त्यांनी एका नामांकित संस्थेतून योगा, स्ट्रेचिंग आणि फायटिंगचे कोर्सेसही केले. तसे, लोक पूजा भालेकरला अभिनेता ब्रूस लीची फॅन म्हणतात. तिच्या आवडत्या अभिनेत्यापासून प्रेरणा घेऊन पूजाने मार्शल आर्ट शिकण्याचा निर्णय घेतला. यामुळे 'लडकी : एन्टर द गर्ल ड्रॅगन' या चित्रपटात पूजा एका मार्शल मुलीच्या भूमिकेत दिसली होती. तिचा हा पहिल्याच चित्रपट तिच्यातील अभिनय गुण आणि मार्शल आर्ट यांची उत्तम अनुभूती देणारा होता.