ETV Bharat / entertainment

सुहानासोबत शाहरुख सुरू करणार 'किंग'च शूटिंग, सिद्धार्थ आनंद निर्माता तर सुजॉय घोष करणार दिग्दर्शन - सुहानासोबत शाहरुख सुरू करणार किंगच शूटिंग

SRK and Suhana Khan film together : सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान आपल्या पहिल्याच 'किंग' या चित्रपटाचं शूटिंग जानेवारीत सुरू करतील. हा एक धमाकेदार अ‍ॅक्शन पॅक्ड थ्रिलर चित्रपट असेल. या चित्रपटाची निर्मिती शाहरुख खान आणि 'पठाण'चा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद मिळून करणार आहेत. मात्र हा भावनीक कथानक असलेला चित्रपट असल्यानं याचं दिग्दर्शन सुजॉय घोषवर सोपवण्यात आलंय.

SRK and Suhana Khan  film together
सुहानासोबत शाहरुख सुरू करणार 'किंग'च शूटिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 21, 2023, 3:43 PM IST

मुंबई - SRK and Suhana Khan film together : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान आणि त्याची मुलगी सुहाना खान पहिल्यांदाच एका अ‍ॅक्शन-पॅक थ्रिलर चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत. हा चित्रपट सुजॉय घोष दिग्दर्शित करणार असून या चित्रपटाची निर्मीती रेड चिलीज एंटरटेनमेंट सिद्धार्थ आनंदच्या मार्फलिक्स एंटरटेनमेंटच्या सहकार्याने करेल. या चित्रपटाचं शूटिंग पुढील वर्षी जानेवारीमध्ये सुरू होणार असल्याचं सांगितलं जातंय.

शाहरुख खान आणि सुहानाच्या या चित्रपटाचे शीर्षक 'किंग' असणार आहे. हा एक वेगवान अनोखा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट असेल. वडील-मुलीच्या नात्याभोवती फिरणाऱ्या चित्रपटाची अपेक्षा केली जात असताना शाहरुख आणि सुहाना पहिल्या चित्रपटात अ‍ॅक्शन थ्रिलरसाठी काम करणार आहेत.

'किंग' चित्रपटाच्या निर्मितीची पूर्व तयारी जोरात सुरू आहे आणि याचं नॉन-स्टॉप शूटिंग जानेवारी 2024 मध्ये सुरू होणार आहे. 'पठाण' चित्रपटाच्या शूट दरम्यान सिद्धार्थ आनंद आणि किंग खान यांच्यात एक मजबूत बंध निर्माण झालाय आणि आता हे नातं ते आगामी चित्रपटासह आणखी मजबूत करण्याचा विचार करत आहेत. सिद्धार्थने स्वतःला अ‍ॅक्शन प्रकारातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सिद्ध केलंय आहे आणि तो 'किंग'मधील सर्व अ‍ॅक्शन सीक्वेन्सची देखरेख करेल.

दरम्यान, सुजॉय घोष 'किंग' चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनवर लक्ष केंद्रित करत आहे आणि अ‍ॅक्शन थ्रिलरच्या स्क्रिप्टला अंतिम स्वरुप देत आहे. हा चित्रपट अनेक चेस सीक्वेन्ससह आकर्षक असेल. मात्र, कथानकाचा गाभा भावनिक कथेवर आधारित आहे आणि त्यामुळेच सुजॉयकडे दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.

'किंग' चित्रपटाला अद्याप वेळ लागणार असला तरी शाहरुखच्या चाहत्यांची उत्कंठा यामुळे वाढलीय. दरम्यान, शाहरुख खान 21 डिसेंबर रोजी 'डंकी' चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज आहे. राजकुमार हिराणी दिग्दर्शित या चित्रपटात तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी यांच्याही भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. 'सिंघम' पुन्हा गर्जना करणार, अजय देवगणचा 'सिंघम अगेन'मधील फर्स्ट लूक रिलीज

2. अल्लू अर्जुननं मुलगी अर्हाच्या वाढदिवासानिमित्त शेअर केली पोस्ट, पाहा फोटो

3. 'बिग बॉस 17'मध्ये अंकिता लोखंडेनं सुशांतच्या अंत्यसंस्काराबाबत केला धक्कादायक खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.