ETV Bharat / entertainment

'फायटर'मधील 'हीर आसमानी' गाण्याचा टीझर प्रदर्शित - हृतिक रोशन

Fighter next song : अभिनेता हृतिक रोशन स्टारर 'फायटर' चित्रपटामधील 'हीर आसमानी' हे गाणं 8 जानेवारीला रिलीज होणार आहे. दरम्यान या गाण्याचा टीझर हा प्रदर्शित करण्यात आला आहे.

Fighter next song
फायटर पुढील गाणे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 5:28 PM IST

मुंबई - Fighter next song : अभिनेता हृतिक रोशनच्या आगामी 'फायटर' चित्रपटातील 'हीर आसमानी' या नव्या गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 'शेर खुल गए' आणि 'इश्क जैसा कुछ'नंतर चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'फायटर'चं हे गाणं 8 जानेवारीला रिलीज होणार आहे. हृतिक रोशनच्या एरियल अ‍ॅक्शन चित्रपट हा थोडा हटके असणार आहे. 'हीर आसमानी' या गाण्यात दीपिका आणि हृतिकची जादू पाहायला मिळत आहे. हा चित्रपट देशाच्या सुरक्षेमध्ये गुंतलेल्या लढाऊ वैमानिकांना समर्पित आहे. या चित्रपटात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण अनिल कपूर यांसारखे स्टार्स मुख्य भूमिकेत आहेत.

'फायटर' चित्रपटामधील गाणं : हृतिक रोशननं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर 'हीर आसमानी'चा टीझर शेअर केला आहे. या गाण्याचे पार्श्वसंगीत हे दमदार असल्याचं दिसून येत आहे. याशिवाय या गाण्यात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण एअरफोर्सच्या गणवेशात दाखवण्यात आले आहेत. 'स्काय इज द लिमिट' असे गाण्याच्या टीझरमध्ये लिहिले आहे. या गाण्यामध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्या मैत्रीची झलक पाहायला मिळते. या चित्रपटामध्ये अनिल कपूर, संजीदा शेख हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. टीझर रिलीज करण्यासोबतच हृतिकनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, ''जमीन वालों को नजर नहीं आनी, मेरी हीर आसमानी. हे गाणे 8 जानेवारीला रिलीज होणार आहे.''

'फायटर' चित्रपटाबद्दल : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 25 जानेवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटामध्ये हृतिक हा स्क्वाड्रन लीडर समशेर पठानियाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दीपिका पदुकोण स्क्वाड्रन लीडर मीनल राठोड उर्फ ​मिनीच्या भूमिकेत असेल. याशिवाय अनिल कपूर या चित्रपटात कमांडिंग ऑफिसर ग्रुप कॅप्टन राकेश जयसिंगच्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान हृतिक आणि दीपिकाच्या वर्क्रफंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'वॉर 2' आणि 'क्रिश 4'मध्ये दिसणार आहे. दुसरीकडे दीपिका ही 'कल्कि 2898 एडी' 'लव 4 एव्हर' या चित्रपटांमध्ये दिसेल.

हेही वाचा :

  1. 'सालार'ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरूच, पाहा किती झाली कमाई
  2. 'डंकी'च्या सक्सेस पार्टीमधील शाहरुख खान राजकुमार हिरानी आणि अनिल ग्रोवरचे फोटो व्हायरल
  3. मुंबई संस्कृती महोत्सवाच्या 32 व्या सोहळ्यात रसिकांना मिळणार संगीताची पर्वणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.