मुंबई - अभिनेत्री परिणीती चोप्रा दिल्लीत राघव चड्ढासोबत पार पडलेल्या एंगेजमेंट सोहळ्यात भाग घेतल्यानंतर मुंबईला परतली आहे. यासोहळ्याला हाय प्रोफाइल सेलेब्रिटी आणि तारेतारका उपस्थित होते. या कार्यक्रमातील पूर्वी न पाहिलेले काही फोटो परिणीतीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. आपले दिल दिल्लीत राहिल्याचे तिने या पोस्टमध्ये म्हटलंय. राघव चड्ढासोबत तिचे असलेले प्रेम तिने या पोस्टमधून सुंदर पद्धतीने व्यक्त केलंय.
परिणीतीची राघवबद्दल सुंदर पोस्ट - सोमवारी इंस्टाग्रामवर परिणीतीने एक सुंदर पोस्ट लिहिली ज्यामध्ये तिने राघवसोबतची तिची प्रेमकहाणी, राघवमध्ये असलेले अलौकिक गुण आणि स्वप्नवत पार पडलेल्या एंगेजमेंट सोहळ्याविषयी सविस्तर तिने लिहिले आहे. 'जेव्हा तुम्हाला माहिती असतं तेव्हा कळतंच. एक ब्रकफास्ट एकत्र केला आणि मला समजले. मी एका व्यक्तीला भेटले. एक खूप छान अद्भुत माणूस ज्याची जबरदस्त क्षमता म्हणजे संयमी, शांत राहणे आणि प्रेरणादायी असणे. त्याचे समर्थन, मिश्कील बुद्धी आणि मैत्री अगदी निखळ आनंद दोणारी. ते माझे घर आहे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
साखरपुड्यातील न पाहिलेले परिणीती आणि राघवचे फोटो - शेअर केलेल्या एका फोटोत राघव परिणीतीच्या गालावरचे अश्रू पुसताना दिसत आहे. फोटोमध्ये काही आनंदाचे क्षण देखील आहेत ज्यात कुटुंबातील सदस्य आनंदाने मोहरताना दिसत आहेत. साखरपुड्याचे वर्णन करताना परिणीतीने पुढे लिहिलंय, 'आमची एंगेजमेंट पार्टी एक स्वप्न जगण्यासारखी होती - प्रेम, हशा, भावना आणि नृत्याच्या ओझ्यांमध्ये सुंदरपणे उगवलेले एक स्वप्न! आम्ही ज्यांना खूप प्रिय आहोत त्यांना मिठी मारली आणि त्यांच्यासोबत आनंद साजरा केला, तेव्हा भावना ओसंडून वाहत होत्या. राजकुमारीच्या कथा ऐकून एका लहान मुलीने, माझ्या परीकथेची सुरुवात कशी होईल याची मी कल्पना केली होती. आता ती माझ्या परी कल्पनेपेक्षाही चांगली आहे.'
परिणीती आणि राघव अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. लंडनमधील विद्यापीठाच्या दिवसांपासून हे दोघे एकमेकांना ओळखत असल्याचे म्हटले जाते परंतु प्रणय वरवर पाहता वर्षांनंतर फुलला.
हेही वाचा - Rajasthani Desi Food: सारा अली खान आणि विकी कौशल यांनी घेतला देसी जेवणाचा आस्वाद