ETV Bharat / entertainment

Grand launch of Jai Shri Ram : आदिपुरुष चित्रपटातील जय श्री राम गाण्याचे भव्य लॉन्च, अजय अतुलचा लाइव्ह परफॉर्म्न्स

आदिपुरुष चित्रपटातील जय श्री राम या गाण्याचा भव्य लॉन्चिंग सोहळा मुंबईत पार पडला. चित्रपटाची मुख्य सूत्र सांगणारे हे गीत खूप महत्तवाचे मानले जात आहे. या लॉन्चिंग सोहळ्यात संगीतकार जोडी अजय अतुल यांनी हे गाणे प्रेक्षकांसमोर लाईव्ह परफॉर्म केले.

Grand launch of Jai Shri Ram
आदिपुरुष चित्रपटातील जय श्री राम गाण्याचे भव्य लॉन्च
author img

By

Published : May 20, 2023, 2:36 PM IST

मुंबई : नव्या पिढीसमोर 'रामायण' नव्या पद्धतीने आणण्यासाठी दिग्दर्शक ओम राऊत 'आदिपुरुष' बनवत आहेत. या चित्रपटात तंत्रज्ञान आणि व्हीएफएक्सचा आधुनिक वापर करून रामायणाची कथा समोर आणली जात आहे. या चित्रपटात रामचंद्रच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या भूमिकेत क्रिती सेनन आणि लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंह आहेत. आता या चित्रपटातील 'जय श्री राम' हे नवीन गाणे लॉन्च झालेे आहे. मुंबईत पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात हे गाणे लॉन्च झाले. यामध्ये संगीतकार जोडी अजय अतुल यांनी हे गाणे प्रेक्षकांसमोर लाईव्ह परफॉर्म केले.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

मनोज मुनतासीर शुक्ला यांनी लिहिलेले हे गाणे अजय अतुलने संगीतबद्ध केले आहे आणि गायले आहे. हे गाणे चित्रपटाची मुख्य कल्पना पकडते हे वेगळे सांगायला नको. रामकथा आधुनिक दृष्टिकोनातून मांडायची आहे, असे दिग्दर्शकाने आधीच सांगितले होते. देश-विदेशातील ज्यांना रामायणात रस नाही, त्यांनाही या चित्रपटाची आवड निर्माण होईल, अशी त्यांची अपेक्षा आहे. या चित्रपटाचा टीझर गेल्या वर्षी प्रदर्शित झाला होता. रामजन्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येत या चित्रपटाचा टीझर निर्मात्यांनी रिलीज केला आहे

मात्र टीझर रिलीज झाल्यानंतर लगेचच चित्रपटातील राम-सीता आणि विशेषत: लंकेश रावण यांच्या लूकवर टीका झाली. या चित्रपटात सैफ अली खान रावणच्या भूमिकेत दिसणार आहे. ओम राऊतने या व्यक्तिरेखेसाठी तयार केलेला लुक कोणालाच आवडला नाही. त्यानंतर या महिन्याच्या 9 तारखेला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. बऱ्याच प्रकमाणावर हा ट्रेलर लोकांच्या पसंतीस पडल्याचे चित्र आहे. कोणताही नवा वाद तयार होणार नाही याची काळजी निर्माता व दिग्दर्शकांनी यावेळी घेतली होती.

'आदिपुरुष' चित्रपटाचा 13 जून रोजी न्यूयॉर्कमधील ट्रिबेका फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. रामायणाची कथा या चित्रपटात ज्या पद्धतीने मांडण्यात आली आहे ती आता प्रेक्षकांचे किती लक्ष वेधून घेते हे पाहावे लागेल. मात्र 16 जूनपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही कारण हा चित्रपट त्यादिवशी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

हेही वाचा - Sara Ali Khan runs after selfie : कान्सहून परतलेल्या सारा अलीला घरी जाण्याची घाई, ऐश्वर्याही आराध्यासह परतली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.