ETV Bharat / entertainment

Deepika Padukone on TIME magazine : टाइम मासिकावर झळकली दीपिका पदुकोण, राजकीय प्रतिक्रियांबद्दल केले भाष्य - दीपिका पदुकोण

टाइम मॅगझिनच्या मुखपृष्ठावर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण झळकली आहे. यामुळे दीपिका पदुकोण ही बराक ओबामा, ओप्रा विन्फ्रे यांच्यासारख्या यापूर्वी या मासिकात झळकलेल्या आंतरराष्ट्रीय ख्यातनाम अनेक व्यक्तिमत्त्वांच्या एलिट क्लबमध्ये सामील झाली.

Deepika Padukone on TIME magazine
टाइम मासिकावर झळकली दीपिका पदुकोण
author img

By

Published : May 11, 2023, 4:43 PM IST

नवी दिल्ली - हिंदी सिनेसृष्टीतील स्टार दीपिका पदुकोण, टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर प्रदर्शित होणारी नवीन भारतीय व्यक्तिमत्त्व ठरली आहे. याबद्दल दीपिका म्हणते की, तिला तिच्या 15 वर्षांच्या कारकिर्दीत सततच्या राजकीय प्रतिक्रियाबद्दल काहीही वाटत नाही. यूएस-आधारित आउटलेटसह तिच्या कव्हर इंटरव्ह्यूमध्ये, दीपिकाने ऐतिहासिक तथ्यांचा विपर्यास केल्याबद्दल पद्मावतवर घेण्यात आलेला आक्षेप, तिची पहिली निर्मिती असलेल्या छपाकच्या रिलीजच्या वेळी जेएनयूच्या विद्यार्थ्यांसोबत हजर राहणे आणि पठाण चित्रपटातील बेशरम रंग या गाण्यावरुन तयार झालेला वाद याबद्दल भाष्य केले.

टाइमच्या कव्हर स्टोरीमधील दीपिकाची प्रतिक्रिया - टाइम मासिकाच्या स्टोरीनुसार, जेव्हा पदुकोण हिला सतत राजकीय प्रतिक्रिया बद्दल विचारण्यात आले तेव्हा तीने दीर्घ पॉझ घेतला. ती म्हणाली की, 'मला माहित नाही की मला याबद्दल काही वाटले पाहिजे की नाही. पण सत्य हे आहे की मला याबद्दल काहीही वाटत नाही.' आता ती टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकलेल्या शाहरुख खान, ऐश्वर्या राय बच्चन, आमिर खान आणि प्रियांका चोप्रा जोनास यांच्यासह भारतीय नावांच्या लांबलचक यादीत सामील झाली आहे.

टाइम मासिकाच्या कव्हरवर झळकलेले भारतीय सेलेब्रिटी - 2018 मध्ये, ती माजी भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली आणि कॅब एग्रीगेटर ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांच्यासह टाइम मासिकाच्या 100 सर्वात प्रभावशाली लोकांचा भाग होती. 10 मे रोजी प्रकाशित झालेल्या दीपिका पदुकोण इज ब्रिंगिंग द वर्ल्ड टू बॉलीवूड या शीर्षकाच्या लेखात अभिनेत्री दीपिका म्हणाली: 'हा भारतासाठीचा क्षण आहे'. या वर्षाच्या सुरुवातीला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये, पदुकोणने एसएस राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर RRR मधील सर्वोत्कृष्ट मूळ गाणे ऑस्कर विजेते नाटू नाटू गाण्याच्या सादरीकरणाचे ऑस्करच्या मंचावरुन सूत्रसंचालन केले.

दीपिका पदुकोणने 75 व्या कान फिल्म फेस्टिव्हलसाठी विशेष ज्यूरीमध्ये काम केले आणि लुई व्हिटॉन आणि कार्टियर सारख्या आंतरराष्ट्रीय फॅशन लेबल्ससाठी ती पहिली भारतीय ब्रँड अॅम्बेसेडर बनली. मेट गाला सारख्या फॅशन इव्हेंटमध्ये ती नियमितपणे तिच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेते. दीपिकाने जाहिराती आणि संगीत व्हिडिओंमधून मॉडेल म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

हेही वाचा - Jacklyn Zeman Dies At 70 : जनरल हॉस्पिटल फेम अभिनेत्री जॅकलिन झेमन यांचे ७० व्या वर्षी निधन

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.