मुंबई - Gayatri Joshi Accident: आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'स्वदेस' फेम अभिनेत्री गायत्री जोशी इटलीतील सार्डिनिया येथे झालेल्या अपघातानंतर आता भारतात परतली आहे. गायत्री जोशी आणि तिचा बिझनेसमन पती विकास ओबेरॉय शुक्रवारी मुंबई विमातळावर स्पॉट झाले. गायत्रीचा इटलीत झालेला अपघात हा खूप भीषण होता. या कार अपघातात दोन स्विस नागरिकांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, इटलीतील कार अपघातात ओबेरॉय रियल्टीचे चेअरमन आणि एमडी विकास यांच्यावर तूर्त तरी कुठलीही कारवाई झालेली नाही. अपघात घडला तेव्हा विकास हे कार चालवत होते. सध्या याप्रकरणी चौकशी सुरू आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी इटलीतील परराष्ट्र विभागाने एका पथकाची निवड केली आहे.
गायत्री जोशी ओबेरॉय आणि विकास ओबेरॉय परतले मायदेशी : दरम्यान आता ओबेरॉय रियल्टीच्या एका निवेदनात म्हटले आहे की, 'आमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विकास ओबेरॉय आणि त्यांची पत्नी गायत्री ओबेरॉय यांचा 2 ऑक्टोबर 2023 रोजी सार्डिनिया, इटली येथे अपघात झाला. देवाच्या कृपेनं ते दोघेही सुखरूप आहेत. ठीक आहेत आणि मुंबईत सुखरूप घरी परतले आहेत'. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघाताप्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात विकास ओबेरॉय यांच्यावर आरोप सिद्ध झाल्यास त्यांना सात वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
'स्वदेस'मध्ये गायत्री जोशी दिसली होती : गायत्री जोशीनं 2000 मध्ये मिस इंडिया इंटरनॅशनलमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर तिनं 2004मध्ये शाहरुख खानसोबत 'स्वदेस' या चित्रपटामध्ये काम केलं. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर कमाल करू शकला नाही. मात्र या चित्रपटाला समिक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर 2005मध्ये तिनं बिझनेसमन विकास ओबेरॉयशी लग्न केलं. त्यानंतर तिनं ग्लॅमर इंडस्ट्री सोडली. गायत्रीचे पती विकास ओबेरॉय मुंबईत रिअल इस्टेट फर्म चालवतो. तसेच गायत्री देखील आपल्या पतीच्या व्यवसायात हातभार लावते. या जोडप्याला विहान आणि युवान ओबेरॉय अशी दोन मुले आहेत.
हेही वाचा :