ETV Bharat / entertainment

शाहरुखचा शर्टलेस फोटो व्हायरल, अॅब्स दाखवताना दिसला पठाण

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आपली थोडीशी भर घातली आहे. त्याने सोशल मीडियावर स्वतःचे शर्टलेस फोटो पोस्ट केले आणि त्याच्या चाहत्यांना त्याबद्दल आश्चर्यचकित केले.

author img

By

Published : Sep 26, 2022, 1:57 PM IST

शाहरुखचा शर्टलेस फोटो व्हायरल
शाहरुखचा शर्टलेस फोटो व्हायरल

मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानने ( Shah Rukh Khan ) ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आपली आणखी थोडीशी भर घातली आहे, कारण त्याने सोशल मीडियावर स्वतःचे एक शर्टलेस फोटो पोस्ट केले आहेत. त्याच्या या फोटोवर चाहते बेहद्द खूश दिसत आहेत.

एकापाठोपाठ एक तीन मोठ्या रिलीझ प्रतीक्षेत असलेल्या या अभिनेत्याने रविवारी त्याच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला. यात तो सोफ्यावर बसलेला असून लांब केस, पिळदार शरीरसौष्टव केलेले अ‍ॅब्स यामुळे तो सुंदर दिसत आहे.

त्याच्या कॅप्शनमध्ये शाहरुखने लिहिलंय: "मी टू माय शर्ट टुडे : 'तुम होती तो कैसा होता. तुम इस बात पे हैरान होती, तुम इस बात पे कितनी हंसती... तुम होती तो ऐसा होता.' मी पण #पठाणची वाट पाहत आहे. शाहरुख खानच्या शर्टलेस फोटोवर कमेंट करताना गौरी खानने लिहिले, 'अरे देवा.. आता तो त्याच्या शर्टशीही बोलतोय'. .

शाहरुख खानच्या शर्टलेस फोटोवर गौरी खानची कमेंट

SRK ने फोटो शेअर करताच, त्याच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये गर्दी केली आणि लिहिले की: "2023 तुझे आणि फक्त तुझे आहे! प्रत्येक वेळी जेव्हा मी विचार करतो की तू किती मेहनत घेत आहेस ते मला खूप भावूक करते. पुढच्या वर्षी तीन चित्रपट घेऊन येत आहेस. माझे सर्व प्रेम आणि आदर, माझा हिरो."

हेही वाचा - जॅकलिन फर्नांडिसला २०० कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मिळाला अंतरिम जामीन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.